पान:श्रीएकनाथ.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ श्रीएकनाथ. M PUTY व्यर्थ जानव्याची आणि शेंडीची ताडातोड केली. यांचा संन्यास मला पोकळ अवडंबर दिसतो. (मठाधिपति एकनाथाकडे पाठ करून प्रवेश करितो. धर्माधिकारी त्याच्या मागून प्रवेश करितो.) मठाधिपति--तुम्ही माझे सांप्रदायिक प्रत्यक्ष माझे शिष्य असे असून तुम्ही माझा आज्ञाभंग केला. रौरव नरकाला जाल. हाच शाप. धिक्कार असो तुम्हांला. ज्याने प्रारुत ग्रंथ केला, त्याचे मला मुखावलोकन करावयाचे नाही, म्हणून मी त्याचेकडे पाठमोरा चालत आलो. षट्शास्त्रांत मी पारंगत असून रामेश्वरापावेतों आज माझा हात धरणारा कोणी आहे काय ? असे असून तुम्ही माझा हा केवढा अपमान केला. त्याला पांचत्रिक पंधराशें सोटे कां मारले नाहीत ! आतां त्याच्या आणि माझ्या दरम्यान पडदा धरा. आम्ही वादास प्रवृत्त होतो. (एकनाथ व मठाधिपति यांच्या दरम्यान एक छाटी धरितात.) गाववा--शुभमंगल सावधान-वाघाचे डोळे-हरणाचे कानब्रम्हचारी बटवे. शुभमंगल सावधान. एकनाथाला तर बायका आहेच, पण या यतिमहाराजांना मात्र नाही. (कांहीं संन्यासी गाव बाला मारतात.) श्रीखंड्या--अहो तो वेडा आहे. त्याला काही समजत नाही. तुझी त्याला विनाकारण मारूं नका. तुम्ही फार पुण्यवान, केवळ परमेश्वरासारखे आहांत. एवढा वेडा ब्राम्हण शहाणा कराल तर आमच्यावर मोठे उपकार होतील. मठाधिपति--बडबड पुरी कर. (एकनाथास) शास्त्रयांचे, पंडितांचें, पुराणिकांचे आणि आम्हांसारख्या यतींचे महात्म्य तुझ्या प्रधान कमी होईल याची वाट काय ! एकनाथ -अतिशूदान्त मंडळीचा उद्धार होण्याची वाट काय ! मठाधिपति--भागवत ग्रंथाचे प्रारुतांत भाष्य करण्याचा अधिकार तुला कोणी दिला! एकनाथ--आपण षट्शाखांचे अध्ययन केले आहे, त्यांत 'असे कोर्ट नमूद केले आहे की काय १ की, भागवत ग्रंथाचे प्रारु