पान:श्रीएकनाथ.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. ११७ श्रीखंड्या जर बरोबर नसता तर वाटेत यतिमहाराजांनी आमची चांगली लंबी केली असती, परंतु त्याला पाहतांच ते भिऊन जात. विवेकानंदकां ब्रह्मानंद, आपल्याला मठाधिपतीची आज्ञा काय आहे ? एकनाथास दंडाने ताडण करण्यास आरंभ करूं काय ? स्वामींची आज्ञा आहे की, प्रत्येकानें पांच पांच सोटे मारावेत ! - ब्रह्मानंद-गुरुजीने सांगितल्याप्रमाणे करण्यास हरकत नाही. परंतु हा ब्राह्मण जर मार खातांखातां मेला, तर ब्रह्महत्येचे पातक आपल्या बोडक्यावर कोणी घ्यावयाचें ? गुरुमहाराज राहतील नामानिराळे. शिवाय याच्या मुखाकडे पाहिले झणजे हा कोणी अद्वितीय पुरुष-कोणी अवतारीक-असा तुह्मास दिसत नाही काय ! कसा शांतवृत्तीने सहजस्थितीत बसला आहे. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर त्याच्याविषयी पूज्यभाव उत्पन्न होतो. क्रोध ठिकच्याठिकाणी नण्ट होतो. आणसी याला सद्भावाने साष्टांग नमस्कारच करावा असे वाटते. [सर्व संन्यासी पायां पडतात.] धर्माधिकारी-तुह्मी शिष्य उन्मत्त आहांत. श्रीगुरूच्या आज्ञेचें अवहेलन करितां ! त्यांचे आज्ञेप्रमाणे जर तुझी त्याला एकेकजण पांचपांच सोटे मारीत नसाल, तर आतां जाऊन त्यांना सांगतों की, हे तुमचे उन्मत्त शिष्य एकनाथास जाऊन मिळाले. त्याला नमस्कार करितात. त्याच्यापुढे हात जोडून उभे राहतात. हा पहा मी चाललो. (जातो.) श्रीया -(लांब पाहिलेंसें करून.)हं इकडेसच येत होते मठाधिपति बरें का, इतक्यांत धर्माधिकारी लागले जाऊन त्यांच्या कानाशी. आतां तर काय, हे महंत क्रोधाने इतके तप्त झाले आहेत की, यांच्या नेत्रांतून संतापरूपी ज्वाला बाहेर पडतात की काय कोण जाणे असे मला वाटते. नारायणनामाची लाखोली प्रहाद वाहतो हे पाहून हिरण्यकशिपूर्ने क्रोधाने थैमान केला किंवा श्रीरामचंद्राला विभीषण शरणागत झाला हे पाहून रावण जसा करकरां दांत चावं लागला, तसा या संन्याशाला कोध आतां कांही आवरेनासा झाला आहे. षविकारांचा नाश करील तो खरा संन्यासी. बाहेरून दंडण-मुंडण करून भगवी नेसून कोणी संन्यासी होत नाही. यांनी