पान:श्रीएकनाथ.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ श्रीएकनाथ. नाथ नांवाचा माझा गुरु आहे. पैठणास रोज भजन, पूजन, ब्राह्मणसंतपंण, ब्राम्हणपूजन, त्यांच्या चरणांचे तीर्थप्राशन, इत्यादि सत्रुत्यै करून संसारांत राहून परमार्थ करीत आहे. श्री जनार्दन स्वामी त्यांचे गुरु. त्यांच्या पायांच्या रुपेकरून त्यांना कवित्वस्फूर्ति होऊन त्याने भागवत ग्रंथावर आम्हां भाविक जनाकरितां प्रारुत टीका करण्यास आरंभ केला आहे. मठाधिपति--ठीक ठीक. भागवत ग्रंथ केवळ उपनिषदांचें सार, तुमचे गांवचा कवि एकनाथ प्रारुतांत करीत असतो. या अपराधाबद्दल त्यास त्याच्या ग्रंथासहवर्तमान ताबडतोब येथे पाठवून देण्याविषयी आम्ही पैठणचे धर्माधिकान्यास पत्र पाठविले आहे. त्याला येथे बोलावून आणून त्याची चांगली फजिती करतो. ब्रह्मानंद महाराज, त्याला येथे येऊं तर या, ह्मणजे मीच. त्या दुर्मतीला एका क्षणांत वादांत जिंकून टाकतों. मठाधिपति-त्याला वादांत जिंकण्यापूर्वी माझी तुझांला अशी आज्ञा आहे की, तुझी माझे एकंदर तिनशे शिष्य आहांत. तरी प्रत्येकाने त्या एकनाथाला पांच पांच दंड सपाटून मारावे, कारण त्याने भागवत ग्रंथ मराठी भाषेत करण्यास आरंभ केला आहे. इतक्यावर तो जिवंत राहिलाच तर मग वाद करण्याचे पाहूं. आतां मी मठभिक्षा करावयास जातो. (एकनाथ, गावबा, श्रीखंड्या व पैटणचे धर्माधिकारी प्रवेश करितात. एक संन्यासी एकनाथास धरून आणल्याची खबर देतो.) हा आलाच तो. मी जातो आतां तुझांला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी कार्यभाग करा. (जातो.) गावबा-एकनाथ, श्रीखंड्या ह्मणतो आपण पैठणाहून येथपावेतों पायीं आलांत. घोडागाडी वगैरे वहानावर आपल्यास या संन्याशांनी बसू दिले नाही. आपण फार थकून गेला असाल, करितां मला आपल्या चरणसंवाहनाची परवानगी असावी. एकनाथ-बाह्मणाच्या हाती पाय रगडून घेऊन अधःपाताचें साधन मला करून घ्यावयाचे नाही. तुझी माझ्याकरितां कष्ट सोसून येथपावेतों आलांत हे पाहून माझा जीव कासावीस होत आहे. त्यातून श्रीखंड्या तर मला मार्गावर ठिकठिकाणी संभाळीत होता.