पान:श्रीएकनाथ.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. ११५ आणखी पुष्कळ ग्रंथांवर टीका केली आहे. चतुःश्लोकी भागवतावर टीका, हस्तामलकावर टीका, स्वात्मसुख नांवाचे शुकाष्टकावर टीका. याशिवाय ते केवळ आझांसारख्या प्रारुत आणखी भोळ्या जनांकरितां फार श्रम घेऊन भावार्थरामायण नांवाचा अतिशय मोठा ग्रंथ लिहीत आहेत. त्यांचे नांव एकनाथ. भागवताच्या दोन अध्यायांवर त्यांची झालेली टीका मी उतरून घेऊन तिचे नित्य पठण करित असतो. तेच तेच अध्याय रोज वाचीत असतो. ब्रह्मानंद--मला हेच आश्चर्य वाटते की, पैठणच्या धर्माधिकान्यांनों हे रुत्य सहन कसे केलें ? त्यांनी एकनाथाला शिक्षा कां नाही केली ? बरे ते असो. भटजीबुवा, तुह्मी आपला हा उत्तम ग्रंथ घेऊन आमच्याबरोबर आमच्या मठाधिपतीकडे चला. मग त्यांचा हकूम होईल त्याप्रमाणे तुम्हांला काय शिक्षा होणे असेल ती होईल. मधुसूदन--(घाबरून पोथी बांधतो.) आपण संन्यासी, कामक्रोध जिंकलेले, वासनादेवाचे निर्मूलन केलेले, क्षेत्रवासी, महाविद्वान आहात. आपण काय शिक्षा कराल ती मी निमटपणे सोशीन. पण रोज हैं प्राकृत भागवत वाचण्यास मात्र चुकणार नाही. ( मधुसूदनास धरून मठाधिपतीकडे नेतात.) मठाधिपति--मला तुमच्याविषयी सर्व हकीकत कळली आहे. तुमचा गरु जो एकनाथ त्याला पैठणाहन खेचून आणण्याकरितां मी आपल्या शिष्यांना मागेच रवाना केले आहे. आज उद्यां त्यांची येथे येण्याची वाटच आहे. मला माझ्या शिष्यांनी तुम्ही भागवताच्या अध्यायाचे महाराष्ट्र भाषेत पाठ रोज मणिकर्णीकेच्या घाटावर करीत असतां, हे मार्गेच कळविले आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्र भाषेचें प्राबल्य होऊन गीर्वाण भाषेतील सर्व ग्रंथांवर टीका होतील. बाह्मणांचे वर्चस्व कमी होऊन अन्य जात विद्वान होईल. याबद्दल मी तुमच्या गुरूला नुस्ता जबाबदारच न धरितां त्याला चांगला येथे मार देतो. पुनः त्याच्या हातून अशी गोष्ट न होण्याबद्दल खबरदारी घेतो. तुमचा हा जो कवीश्वर आहे, त्याच्याविषयी आम्हांला एकंदर वर्तमान सांगा. मधुसूदन--महावैष्णव, केवळ विष्णूचा अवतार, असा एक