पान:श्रीएकनाथ.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ श्रीएकनाथ. हर्ष ते वदन गजराजा । चारी पुरुषार्थ त्याचि चारी भुजा। प्रकाशियां प्रकाशी वोजा। तो झळकत तुझा दंतु ॥ ५ ॥ (ओव्या वाचीत असतां तें ऐकण्याकरितां कांहीं संन्यासी जवळ येऊन बसतात.) ब्रह्मानंद भवान् कुत्राधिवसति । किं पुस्तकं भवान् वाचयति । किमे तत्पुस्तकस्य नाम। गंगा किं भवतोऽभिधानम्। फिर अपि ब्राह्मणो भवान् । शिर कां विवेकानंद, कसे काय आहे ? मला वाटतें हा ब्राह्मण मोठा पंडित आहे. कंसला तरी संस्कृत ग्रंथ वाचीत असेल. अध्ययन मोठे असेल, ह्मणून मी संस्कृत भाषेत काही प्रश्न केले, परंतु बुवाला संस्कृताचा गंधही पण दिसत नाही. महाराष्ट्र भाषेत कांहीं प्रश्न करून तूं तरी विचार. कोणता ग्रंथ आहे! काय वाचीत असतात ? विवेकानंद-महाराज, आपलें वास्तव्य कोठे असते ? आपण हा ग्रंथ जो वाचीत आहां त्याचे नांव काय, तें आह्मांस रुपा करून सांगाल काय? मधुसूदन-यतिमहाराज,हें भागवत आहे. (सर्व संन्यासी हंसतात.) ब्रह्मानंद--(हंसत हंसत) सान्या जन्मांत भागवत नांवाचा. महाराष्ट्रग्रंथ मी आजच ऐकला. कोणीकडे संस्कृत भाषेची थोरवी आणखी कोणीकडे ही महाराष्ट्र भाषा ! एखाद्या सकलगुणसंपन्न सार्वभौम राणीपुढे दीडदमडीचे बटकूर आणून उभे करावें, नाही तर सरस्वतीपुढें ग्रामदेवता जी मरीआई ती आणावी, किंवा मोरापुढे डोमकावळा, किंवा पंडितापुढे अजागळ, किंवा चिंतामणीपुढे कांदा, तशी ही तुमची महाराष्ट्र भाषा संस्कृतापुढे आहे. ते विद्वान कवि शिरोमणि ज्यांनी भागवत ग्रंथावर टीका केली, त्यांनी आणखी कांहीं ग्रंथावर मुखरस पाघळला आहे काय ? मधुसूदन--आपण अवहेलना करा किंवा काय वाटेल ते म्हणा, मी तर मोठ्या भाविकपणाने त्यांच्या ग्रंथाचे पठण करतो. त्यांनी