पान:श्रीएकनाथ.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा प्रवेश पहिला. स्थळ--काशीक्षेत्रांतील मणिकर्णीकेचा घाट, ज ( मधुसूदनाचार्य भागवताची पोथी घेऊन प्रवेश करितो.) मधुसूदन-आझी सर्व पैठणकर अज्ञान आणखी भोळ्या लोकांनी झणजे ज्यांना गीर्वाण भाषेचे ज्ञान नाही, अशा लोकांनी एकनाथास विनंति केली की, आमच्याकरितां भागवतांतील एकादश स्कंधावर महाराष्ट्र भाषेत टीका करावी. आमचे विनंतीला त्याने मान दिला. टीका करण्यास आरंभ केला. प्रथम दोन अध्याय होतांच मी मोठ्या आवडीने ते लिहून घेतले. रोज स्नान झाल्यावर त्यांचा पाठ करीत असतो. पैठणाहून काशीस आलो. आजरोजी ते अध्याय येथे मणिकर्णीकेचे घाटावर नित्य नियमाप्रमाणे मी तर वाचणार, मग येथील यतीश्वर महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेल्यास माझ्या जिवावर अगर एकनाथाच्या जिवावर काय अनर्थ गुजरेल तो गुजरो. (पोथी वाचण्यास आरंभ करितो.) A. ओव्या . - श्री गणाधिपतये नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः॥ श्री कुलदेवतायै नमः॥श्री कृष्णपरमात्मने नमः ॥ ॐ नमो जी जनार्दना ॥ नाहीं भवाभव भावना । न देखोनि मी. तूंपणा । नमन श्रीचरणा सद्गुरुराया ॥१॥ नमन श्री एकदंता । एकपणे तूंचि आतां । एकी दाविसी अनेकता। परी एकात्मता न मोडे ॥२॥ तुजमाजी वासु चराचरा । णोनी बोलिजे लंबोदरा। यालागीं सकळांचा सोयरा। साचोकारा तूं होसी ॥३॥ तुज देखे जो नरू । त्यासि मुखाचा संसारू । यालागी विनहरू । नामादारू तुज साजे ॥४॥