पान:श्रीएकनाथ.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामन शिरवळकर यांनी आझांस बाळपणी केलेल्या सदुपदेशाचे होय. ईशकृपेने आमचे वडीलमातोश्री हयात असून वडिलांची पन्नास वर्षांच्या वर श्रीपंढरपूरची वारी आहे, व त्यांचे वय ऐशी वर्षांवर अमून रोज कमीत कमी सहा तासांचे तरी श्रीज्ञानेश्वर-एकनाथ-नामदेव-तुकाराम यांच्या ग्रंथांचें परिशीलन आहे. पंढरपूर येथील प्रसिद्ध साधु वै. गंगुकाका शिरवळकर हे आमच्या वडिलांचे सख्खे चुलते अमून ह्यांनी स्थापन केलेल्या भजनाच्या सप्ताहांतील वीणा पाऊणशे वर्षे होत आली अद्याप भूमीवर टेविला नाहीं भक्तिरसपर नाटकांची उभारणी होण्यास सर्वतोपरी तेच कारणीभूत असूना आमचे हातून पुढे होणाऱ्या श्रीनामदेव नाटकास तरी आम्हांस त्यांच्या आशीर्वादाचाच आधार आहे. पुत्रधर्माला अनुसरून आझी त्यांचे वंदन करून आपले मातृपितृप्रेम व्यक्त करितों. आम्हीं पूर्वी रचिलेले श्रीतुकाराम नाटक येथील डेक्कन व्हाक्यूलर ट्रान्सलेशन सोसायटीस पसंत पडून त्यांनी आम्हांस बक्षीस दिले, याबद्दल आम्ही सोसायटीचे फार आभारी आहोत. श्रीएकनाथ नाटक ह्यापूर्वीच चार महिने छापून विक्रीस तयार झाले असते, परंतु येथे उद्भवलेल्या प्लेगामुळे छापखान्यांत खिळे जुळण्याकरितां मिळणाऱ्या लोकांची तूट पडली व यामुळे जरी बराच विलंब लागला, तरी छापखान्याचे मालकांनी आमचें नाटक विशेष काळजी घेऊन मनाप्रमाणे छापून दिले, याबद्दल आमी २ त्यांचे आभारी आहोत. ग्रंथ शेवटास जाणें हें ईश्वरकृपेचें फळ आहे. ग्रंथकर्तृत्वाचा मीपणा मिरविणे व्यर्थ होय. शेवटी सुज्ञ वाचकांपुढे एवढेच म्हणणे आहे की: परि हे मियां केलें ॥ की हे माझेनि सिद्धी गेलें ॥ ऐसें नाहीं ठेविलें ॥ वासनेमाजी ॥१॥ श्रीज्ञानेश्वर. मुक्काम पुणे पेट कसबा । घरनंबर २१० ता.१० माहे मे, सन १९०३ ड. वासुदेव रंगनाथ शिरवळकर, ग्रंथकर्ता. HTU no Ft