पान:श्रीएकनाथ.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

of Berar; but no attention was paid to the message. Pernalleh was taken, as also other fortresses with Tuffal Khan .and Direa Ummed-al-Moolk, who were kept prisoners.” इमादशाहीविषयीं तो असे लिहितो :-- then mmad Shahi-[t was so called from the founder Ummad al Moolk, a Chief of the Bhamenee Sultans. This monarchy lasted tiirough four generations. The last Prince, Boorahan Ummed Shaw, was only nominal sovereign, the power being usurped by his minister Tuffal Khan. He was reduced by Mortiza Nizam Shaw, who added Berar to his own dominions in the year 1574." Ferishta's History of the Deccan, एकनाथाने केलेल्या पराक्रमाविषयीं महिपती लिहितो :-- लीलावतारी एकनाथ ॥ लाघव दाखवितसे शत्रूतें ॥ थोडेंच सैन्य याचे होते ॥ परि दिसतें बहु तयालार्गी ॥१॥ बाण सुटती सणसणा ॥ शस्त्रे वाजती खणखणा॥ वीररस माजला जाणा ॥ युद्धकंदना मिसळले ॥२॥ झुंज जहालें घटका चार ।। धुळीने कोंदून गेलें अंबर ॥ तरी नाटोपेचि वैष्णववार ॥ परसैन्य समग्र पळालें ॥३॥ शत्रूसि आणोनि नगरांत ॥ यजमानासि भेटवीत ॥ वस्त्र भूषणे देवोनि त्यातें ॥ ह्मणे स्वस्थानातें जा आतां ॥४॥ श्रीज्ञानेश्वरमहाराज, श्रीजनार्दनस्वामी, चक्रपाणि, श्रीखंड्या, मलंग, गावबा, कानडावाणी, व्यंकटाचार्य पुराणिक, पैठणचा धर्माधिकारी. काशीचा मठाधिपती, सरस्वतीबाई, गिरजाबाई, राण्या महार, उमीचंद इत्यादि पात्रांची योजना महिपतीच्या वाक्याला धरूनच केलेली असून या, नाटकास मुख्यत्वें आधार महिपतीच्या भक्तलीलामृतांत लिहिलेल्या एकनाथाच्या चरित्राचाच घेतला आहे. हे नाटक होतां होईल तितकें इतिहासाला धरून लिहिले आहे, परंतु कचित् स्थळी नाटकाला गोडी आणण्याकरितां ग्रंथकास पदरची भर घालावी लागली आहे, व स्थळविशेषीं इतिहासांतील गोष्टी मागे पुढे कराव्या लागल्या आहेत. श्रीतुकाराम व श्रीएकनाथ या दोन्ही नाटकांत ज्या ज्या स्थळी भक्तिरसरूपी कोमल वेलीची कलिका विकसित होऊन सहृदय प्रेक्षकाचे अंतःकरणास तन्मय करून नेत्रावाटे प्रेमाश्रु ढाळावयास लावते, ती ती स्थळे हटयंगम होण्याचे सर्व श्रेय आमचे परमपूज्य जन्मदाते वडील ती. रा. रंगो