पान:श्रीएकनाथ.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. पश्यात्ताप झाला आहे की, मी आपली सगळी संपत्ति आपल्याकडेस आणून देतो. मला आतां पैसा नको. घर नको. बायको नको. कांहीं नको. गावबा--मातारपणी तरुण बायकोचा कंटाळाच असतो. उमीचंद--आपण माझी सर्व दौलत धर्मार्थ खर्च करा. मी तिच्यावर तुळशीपत्र ठेवतों. गावबा-जातीचा मारवाडी असून बोलतो चांगला. श्रीखंड्या -मारवाडी झाला तरी मनुष्यच आहेना ! उपकार करणारावर अपकार करण्याची बुद्धि त्याला आतां राहिली नाही. एकनाथ-उमीचंद, तुझी संपत्ति दानधर्मात तूं स्वतःच खर्च कर. आमच्याकडे आणूं नको. परमेश्वराचे तुला प्रत्यक्ष दर्शन झाले. याची साक्ष तुला आतां द्रव्य नकोसे झाले. द्रव्याविषयी लोभ तुझ्या मनांत राहिला नाही. गाववा--महाराज, हा मारवाडी अतिशय कंजूष. एक एक कवडीसाठी प्राण देणारा! याच्या बोलण्यावर तुम्ही भरंवसा ठेवू नका. उमीचंद-मी आतां घरी जातो. सगळी संपत्ति येथे आणून टाकतों, आणखी तुमच्या घरी भाजीभाकरी खाऊन दिवस घालवितो. हा पहा चाललों। सर्व-अहो शेटजी, अहो शेटजी, जरा थांबा. (तो पुढे जातो. सर्व त्याच्या मागून जातात.) [ अंक ४ था समाप्त.]