पान:श्रीएकनाथ.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. १११ एकनाथ-अहो पण तुमच्याकडे रुपये घेऊन आला होता तरी कोण ? उमीचंद-कोण ह्मणजे ? आपण पाठविला तोच. हा आपल्यापुढे उभा असलेला श्रीखंड्या.. श्रीखंड्या-हा अगदीच वेडा वाणी आहे. गावबा-माझ्यासारखा श्रीखंड्या-भल्या गृहस्था, काल द्वादशी, रात्री महाराजांचें। कीर्तन झाले, मी येथे पखवाज वाजविण्यास उभा होतो. कीर्तन प्रहर-3 -रात्र उरेपावेतों चालू होतें. तुझ्या घरी मी आलों केव्हां ? आणखी सातशे रुपये माझ्या बापाने ठेवलेत. रुपयांचे आणखी माझें वांकडे. मला रुपये पाहिजे असते तर मी महाराजांजवळ पगार मागितला असता. त्यांनी मला दिला असता. पण मी रुपयांना शिवत नसतों. उमीचंद--महाराज, हा अगदी खोटे बोलतो. याने प्रत्यक्ष माझ्या हाती रुपयांची थैली दिली. आणखी आतां नाही ह्मणतो. एकनाथ-मला वाटते, श्रीखंड्याच्या रूपाने हे काम कोणी तरी केले. तोच तो. त्याच्याशिवाय असा अमानुष चमत्कार होणार नाही. उमीचंदा, तूं मोठा भाग्यवान आहेस यांत कांही संशय नाही. तुला भगवंतानें श्रीसंड्याच्या स्वरूपाने दर्शन दिले. आमच्या कपाळी नाही. गावबा-आपल्या घरी तर श्रीखंड्या पाणी भरतो आहे. कपाळी नाहीं असें कां ह्मणतां ? गिरजाबाई--या श्रीसंड्याला घेऊन काय करावयाचे आहे ? याचे रूप घेऊन जो गेला होता तो पाहिजे. श्रीखंड्या-मी आपला पाणक्या श्रीखंड्या, मला घेऊन काय फायदा, फार झाले तर चार घागरी जास्त पाणी आणीन.. उमीचंद-महाराज, मला जे भगवंतानें दर्शन दिले ते त्याला -सहन न होऊन त्याने आपल्याला संकटांतून मुक्त करण्याकरितां दिले. एकनाथ--उमीचंदा, तूं महा भाग्यवान ! अत्यंत धन्य आहेस ! मी तुझे पायांचा दास आहे. उमीचंद--छे छे ! महाराज, असें म्हणूं नका मला.आतां इतका