पान:श्रीएकनाथ.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. पण हा पहा उमीचंद इकडेच येत आहे. ( उमीचंद व गावबा प्रवेश करतात.) उमीचंद-- (नाथाच्या पायां पडून ) महाराज, आपल्याला मी पांडुरंगाची शपथ घातली. उपास पडला. अन्न खाऊ दिले नाही.. याचा मला फार पश्यात्ताप झाला आहे. आपल्याला उपाशी ठेवून मी घरी जाऊन यथेच्छ जेवलो. हर हर ! मी किती दुष्ट आहे ! गाववा--फार दुष्ट. आमची स्वारी की दुकानांत गेली तर आम्हाला या बसा सुद्धा म्हणत नाही. आम्हाला बदाम, खारका, खोबरें कांहीं कांहीं खावयाला देत नाही. उमीचंदापेक्षा मोहना राणी फार चांगली आहे. हा जर दुकानांत नसला तर मग मला गूळ, खोबरें, नाहीतर काही तरी दिल्याशिवाय जाऊ देत नाही. गिरजाबाई-याच्या आपल्या नेहमी खाण्याच्या गोष्टी. नेहमी खाण्याच्या गोष्टी काढू नयेत बरें का. गावबा--मग गोष्टी न करतां मुकाट्याने तीन चार वेळा फक्त गिळीत जावें होय ! बरें आतां असेंच करतो. आणा खायला.. एकनाथ--उमीचंदा, तुला रुपये पटले का? उमीचंद--महाराज, हे काय विचारणे? एकदां रुपये घेतल्या नंतर मी का नाही म्हणणार आहे ! मी इतका हलकट आहे ! एकनाथ--तुला रुपये कोणी आणून दिलेरे ? AF उमीचंद ज्याच्याजवळ आपण दिले त्यानेच. आणखा त्याच्याचजवळ मी रोखा परत केला. एकनाथः--मी तर तुझे रुपये अजून कोणाजवळ परत कर ण्यास दिले नाहीत मला तुझे रुपये देणे आहेत. उमीचंद-महाराज, असें कसें बोलतां ? काल रात्री बारा वाजतां आपण पैसे पाठविले ते मला पोहोंचले. मी रोखा परत केला. ज्याने मला पैसे आणून दिले त्याला मी पुष्कळ सांगितले की, सकाळी रुपये घेतो. या वेळी रुपये पारखण्यास कोणी नाही; पण तो मनुष्य काही केल्या ऐकेना. मला कोतवालाकडे घेऊन जाऊं लागला. मग मी रुपये घेतले. आतां रुपयांची परीक्षा केली, ते फारच उत्तम ठरले. एक शिका आहेत. मी आपल्याकडे रात्रीच येणार होता.