पान:श्रीएकनाथ.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था.' बोलला, तुला माहीत आहेच. शेवटी त्याने पांडुरंगाची शपथही घातली. हा वेळपावेतो आह्मीं अन्न खाले नाही. आतां पाहतो तो भागवतांत वाण्याला लिहून दिलेला रोखा निघाला. हा पहा. (त्याच्या हातांत देतो.) गिरजाबाई--मला वाटने त्याची काही माहिती-झणजे रोखा पोथींत आला कसा-श्रीखंड्याला काही तरी असावी. तो मोठा चाणाक्ष आहे. ही गोष्ट कशी झाली असेल याचा तर्क तुझा कसा काय चालतो, तें आम्हांला सांग. तुझा तर्क नेहमी खरा ठरतो, हे मी आज किती दिवस पाहत आहे. का असेंच की नाही? एकनाथ-अगदी रास्त बोललीस. असा धूर्त पुरुष माझ्या पाहण्यांतच आला नाही. श्रीखंड्या, तुझा तर्क काय चालतोरे ? हां कागद येथे कसा आला असेल ? श्रीखंड्या-महाराज, माझी अल्पबुद्धि आपल्यापुढे किती चालणार ? आपण प्रत्यक्ष सूर्य. मी खद्योत. आपण प्रत्यक्ष महासागर आणि मी एक ओहोळ. पण ज्याअर्थी आपण विचारता त्या अर्थी मला असे वाटते की, पांडुरंगाने आपल्या वेषानें अगर कोणाच्या तरी वेषानें, उद्ववाच्या म्हणा, किंवा गावबाच्या ह्मणा, किंवा व्यंकेटाचार्य पुराणिकाच्या म्हणा, किंवा माझ्या वेषाने म्हणा, त्या उमीचंदाच्या घरी जाऊन आपले पैसे भरले, यांत काही संशय नाही. तो दुष्ट वाणी पैसे मिळाल्याशिवाय रोखा कधीच परत देणार नाही अशी आपली खात्री आहेच. एकनाथ-हरहर ! पांडुरंगा, माझ्यासाठी तूं किती श्रम कर. तोस ! यापेक्षां तूं मला प्रत्यक्ष दर्शन कां देत नाहीस. माझें चित्त दर्शनाकरितां व्याकूळ होत आहे हे तूं जाणत नाहीस काय ? श्रीखंड्या--ईश्वरी माया फार कठीण. कोणाच्या नाहीं कोणाच्या वेषाने देव आपल्यापुढे प्रत्यक्ष येऊन उभा राहिला, तरी हाच देव असा आपल्यास काय पत्ता लागणार ? गिरजाबाई--इतक्या भानगडीत पडण्याचे कारण नाही. त्या उमीचंद वाण्याला कोणी तरी पाठवून घेऊन या. ह्मणजे त्याच्या घरी पैसे नेऊन कोणी भरले याचा तपास लागले.(लांब पाहिलेसे करून)