पान:श्रीएकनाथ.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. (भागवताचे पुस्तक उघडतो. त्यांत उमीचंद वाण्याला लिहून दिलेला. रोखा श्रीकार फाडलेला सांपडतो.) अरे हें काय ! येथे हा रोखा परत कसा आला ? उमीचंद वाणी ह्मणजे साऱ्या मुलखाचा छट. बिना त्याचे रुपये त्याला पटल्याशिवाय त्याने रोखा कधीही दिला नसता. असे असून हा रोखा माझ्या भागवत पुस्तकांत श्रीकार फाटलेला असा आला तरी कसा ! ( गिरजाबाई प्रवेश करते. ) गिरजाबाई:--बरें झालें रोखा परत आला, आज दोन दिवस झाले, पोटांत अन्नाचा लेश नाही. आपण काही खालं नाही, म्हणून बिचाया श्रीखंड्याने कांहींच सालं नाही. त्याला गुराप्रमाणे कष्ट आपल्या घरी पडतात बरें का? बिचारा उपाशीपोटीच पाणी भरीत आहे. त्याला मी किती आग्रह केला की, तुला खाण्याला काही हरकत नाही. उमीचंद वाण्याची शपथ फक्त आह्मां उभयतांना लागं आहे. पण माझ्या ह्मणण्याचा त्याच्या मनावर कांहींच परिणाम होत नाही. एकनाथः-आपण आतां त्याला घेऊनच भोजनास बसूं. तूं कांहीं काळजी करूं नकोस. पण हा रोखा या पार्टीत आला कसा, याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. पांडुरंगा, आज हा मोठाच चमत्कार दाखविलास ! आपल्या आयुष्यक्रमांत आपण अपूर्व चमकार पुष्कळ पाहतो. परंतु प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ मात्र फारच थोड्यांना होतो. ( श्रीखंड्या प्रवेश करतो.) श्रीखंड्या :--प्रत्यक्ष दर्शन परमेश्वराने आपल्यास दिले, पण हाच परमेश्वर आहे, असे आपल्यास समजण्यास मार्ग काय ! भक्तांच्या आयुष्यक्रमांत मला वाटते, अशा पुष्कळ गोष्टी घडून येत असतील. कोणाच्याना कोणाच्या तरी रूपाने देव त्याला अनेक वेळा येऊन भेटत असेल, त्याचे काम करीत असेल. जशी दामाजी करितां विटू महाराने रसद भरली ! एकनाथ:--आजचा प्रकार तरी काही अंशी असाच झाला आहे. श्रीखंड्या:-आज काय झाले आहे महाराज ! एकनाथः-तो उमीचंदवाणी पैशाकरितां काल किती तरी