पान:श्रीएकनाथ.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. १०७ कोठून आलारे ! अरे चोरा, तुला आतां कोतवालाकडे नेल्याशिवाय राहत नाही. (उमीचंदास कोतवालाकडे नेऊ लागतो.) उमीचंद-(पायां पडतो.) तुझ्या पायां पडतों. मला गुन्हा माफ कर. आतां पुनः असे करणार नाही. ( बायको व श्रीखंड्या दोघे उमीचंदास दोहों बाजूने ओढतात. ) एकीकडून बायको एकीकडून श्रीखंड्यादोघे दोहींकडून मला ओढतात. आता मी जगत नाही, मरतो. माझे हात तुटले ! ए बालाजी, तुझं ब्राह्मणभोजन घालीन, पण मला या संकटांतून सोडीव आतां. मोहना-तूं माझा धर्माचा बाप आहेस. आम्ही तुझी मुलें आहोत. आम्हांला एक वेळ गुन्हा माफ कर. एकनाथाच्या बायकोला मी चोळीपातळ नेसवीन. तुला शेलापागोटें देईन. ( नवऱ्यास घरांत ओढून नेऊ लागते.) श्रीखंड्या -घे हे रुपये. (उमीचंदाचे स्वाधीन थैली करतो.) पुनः अर्से कोणाला छळू नकोस. मोहना-चला आपण या भल्या मनुष्याला पोचवायला जाऊं. (त्रिवर्ग जातात.) प्रवेश ७ वा. स्थळ--एकनाथाचें घर. (एकनाथ पूजा करीत बसला आहे.) एकनाथ अभंग तुज सगुण ह्मणों की निर्गुणरे ॥ सगुण निर्गुण पकु गोविंदुरे ॥२॥ अनुमानेना अनुमानेना ॥ श्रुति नेति नेति ह्मणती गोविंदुरे ॥ध्रु०॥ तुज स्थूल ह्मणो की सूक्ष्मरे ॥ स्थूल सुक्ष्म एकु गोविंदुरे ॥२॥ तुज आकार ह्मणो की निराकाररे ।। आकारु निराकारु एकु गोविंदुरे ॥३॥ निवृ. त्तिप्रसादे ज्ञानदेव बोले । बापरखुमा देविवर विलुरे ॥४॥