पान:श्रीएकनाथ.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ श्रीएकनाथ. जा. सकाळी रुपये दुकानावर मोजून पारखून घेईन. रोखा परत करीन. श्रीखंड्या-तुला माझ्या धन्याची तिळभर तरी भीड पडली काय ? त्याला ताडकन पांडुरंगाची शपथ घातलीस. ( डोळ्याला पाणी आणून ) माझा धनी एकनाथ, आणखी त्याची सुशील पत्नी यांच्या तोंडांत अद्यापपावेतों अन्नपाण्याचा लेश नाही. आमी अजून काही खालं नाही. तूं मात्र आणखी तुझी बायको मात्र घी आणि रोटलोघीशकर खाऊन बोक्यासारखे बसला आहांत. भीड वगैरे कांहीं जाणत नाही. या हातांत पैसे आणि या हातांत रोखा. लाव आपिके आबि. नाहीतर चल कोतवालाकडे. मोहना-बाबा, गरम होऊं नको. हा शेट असाच घालवेडा आहे. एकनाथ आणी त्याची बायको यांना आपण व्यर्थ उपास घातले, याचा कांही याला पश्यात्ताप नाही. तुह्मी आपला रोखा आतां न्या. आणखी बिचाऱ्यांना जेवायला घाला. त्यांना कालची एकादशी आणखी आज पुनः उपास. ( नवऱ्यास उद्देशून ) तुम्ही जर या घटकेला रोखा परत दिला नाही, तर आतांच्या आतां बापाकडे निघून जाईन. पुनः सासरी येणार नाही. तुमच्याबरोबर संसार करणार नाही. याद ठेवा. उमीचंद-(एकीकडे ) ही बायको माझें दिवाळे काढील. इच्या पायीं मला नेहमी असें बुडावे लागते. नाहीतर माहेरी जाते. पुनः येत नाही. तरुणपणांत बायको माहेरी राहिली तर लोक मला हंसतील. (वहींतून रोखा बाहेर काढून ) रुपये आतां देऊन जा. राखा सकाळी घरी पाठवून देतो. शपथ वाहतों. श्रीखंड्या -( हातांतील रोरेखा हिसकावून घेऊन ) फार चांगलें. सकाळी रुपये आणून देतो. नंतर रोखा दे. ( झपाट्याने जाऊं लागतो.) उमीचंद-(उरावर मास्न घेतो ) अरे मेरा बाप ! तुला पटकी आली. तुझ्या हाताला किडे पडले ! हा काणी भामट्या आहे. (श्रीखंड्याचे मागें धांवत जाऊन त्याला धरून आणतो.) श्रीखंड्या-तूं म्हणालास माझ्याजवळ रोखा नाही, मग आता