पान:श्रीएकनाथ.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. १०५ उमीचंद--कहनी के छे नहीं, गाम गया. नही तो कहे आव्याज नथी. नहीं तो लाव, लाव, लाव, ताहारु लुगडं पहेरीनें बेसुं ने 'पछी उपर आवी पुछे तो कहे बहार गयाछे. आ तो म्हारी बेहेन छे. ओ भगवान ! साह्य था. सत्यं नारायणनी कथा करावीश. मारा बाप ! श्रीखंड्या -दरवाजा फोडून एकदम आंत घुसेन. तुझ्या नवन्याला खूप बडवीन. मरे मरेतों मारीन. हातापायांत बिड्या घालीन. भर चौकावर घेऊन जाईन. तुरुंगांत टाकीन. कुठे आहे तुझा नवरा ! मोहना-माझा नवरा लांब गांवाला गेला आहे. त्याला जाऊन एक महिना झाला. तो येथून जातांना दौलताबादेला जातों ह्मणून गेला. मग त्याला मोंगलांनी धरून दिल्लीला नेल्याची बातमी आहे. तेथें त्याला अकबर बादशहाचा गुलाम केला. [ उमीचंद यायकोचें वन गुढाळतो.] श्रीखंड्या-अकबर बादशाचे गुलाम होण्याचे त्याच्या नशीबांत नाही, तुझा गुलाम होण्याचे आहे. ( जोराने दार फोडून आंत प्रवेश करतो. उमीचंदास स्त्रीवेषांत पाहून पोट धरून हसू लागतो.) ये शामळो कोतवालाचें नांव ऐकल्याबरोबर शेटाची शेटाणी झालास ! किती भित्रा आहेस तूं ! हे घे आपले सातशे रुपये. (पिशवी पुढे करतो.) उमीचंद--काय लबाड आहेस रे तूं श्रीखंड्या ? सान्या जन्मांत मला कोणी असें फसविले नव्हते. मी नाथाला सांगन तुझी खोड मोडीन. तू इतक्या रात्री कशाला आलास ? आतां रुपये मी घेत नाही. उद्या सकाळी घेईन. कारण रुपयांची पारख बरोबर झाली पाहिजे. श्रीखंड्या-अरे बाबा रुपये सातशे बरोबर आणले आहेत. इतकेच नाही, परंतु एक शिक्का निझामशाई शिक्याचे आहेत. एक रुपया खोटा अगर नरम निघाला तर सातशे रुपये पुनः देईन असें माझा धनी म्हणाला. आतांचे आतां रोखा माझे हातांत टाक. आपले रुपये घे. उमीचंद-तुला का एवढी भीड पडूं नये की काय ! आता