पान:श्रीएकनाथ.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्य इमादशाही १५७४ त बुडविले. त्यावेळी तेथे बुन्हाण अमदशहा नांवाचा नामधारी बादशहा असून सर्व राज्य तोफलवान नांवाच्या त्याच्या वजिराने बळकाविले होते. ह्यावरून तोफलखान हा अत्यंत दुष्ट मनुष्य असावा असे दिसते. इमादशाहीचे राज्य बुडविण्यास तोच कारणीभूत झाला. तोफलखानानें उन्मत्तपणानें दौलताबादेवर चाल केली यावरून प्रथम अगळीक त्याच्याकडूनच घडून आली. तोफलखानाचे व मुर्तजा निजामशहाचे दोन हात झाल्यावर तोफलखान पराजित होऊन सैरावैरा पळू लागला. प्रथम त्यास खानदेशाचे सुलतानाने आश्रय दिला परंतु मुर्तजा निजामशहाचे धमकावणीस भिऊन जाऊन त्याने त्यास सोडिलें. मग तोफलखान व-हाडांत परत येऊन परनाळा किल्लयांत राहिला. तेथून त्याने अकबर बादशहाकडे दाद मागितली. अकबराने आपला वकील मुर्तजा निजामशहाकडे पाठविला परंतु त्याने त्याची परवा केली नाही. परनाळा किल्ला हस्तगत करून तोफलखानास कैद केला व इलिचपूरचे राज्य निजामशाहीस जोडिलें. जनार्दनपंत देशपांडे हे खानदेशांतील चाळीसगांवचे मूळचे राहणारे असून याचे दिवाण होते व एकनाथाने तोफलखान यास तो दौलताबादचा किल्ला सही करीत असतां कैद केला असावा. ही गोष्ट १५७४ चे अगोदर थोडे दिवस घडून आली असावी एकनाथ बारा वर्षे दौलताबादचे किल्लयावर जनार्दनस्वामीची सेवा करीत होता, व ज्यावेळी तो किल्ल्यावर गेला त्या वेळी त्याचे वय आठ वर्षांचे होतें असें महिपतीने भक्तलीलामृत ग्रंथांत लिहिले आहे. ह्यावरून तोफलखानाने जो दौलताबादेवर हल्ला केला तो १५७० चे सुमारास असावा असे दिसते. हा बादशहा इ. स. १५८६ त आपल्या मुलाकडून मारिला गेला. हा आपल्या आज्यापणज्या प्रमाणे फार शूर व धर्मशील होता. प्रसिद्ध इतिहासकार फेरिस्ता याने दिलेली हकीकतही ध्यानात ठेवण्यासारखी आहे. तोफलखानाविषयीं तो लिहितोः " In the year 1572, Mortiza, Nizam Shaw began his expedition to Berar; and succeeded by the gallantry of Chun. geeze Khan, who, drove Tuffal Khan from Elichpore, forced him to seek shelter in the woods, and brought over the inhabitants of the districts by his clemency. Tuffal Khan Bled from place to place and wood to wood, for six months; at the end of which he fled to Khandesh the Sultan of which, at the Nizain Shaw refused him protection. He returned into Berar, took refuge in the fort of Parnalleh, and applied for assistance to the emperor Akber; who sent an Ambassado to Nizam Shah, commanding him to desist from his invasios