पान:श्रीएकनाथ.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. नामें गृहस्थ कऊल देऊन देहगांवची वस्ती रक्षावया निमित्त पाठविले आहेत ॥ हर एकविशीं साहित्य करावें ।। मनाजीराव सुभेदार बुधाजी पंत फडणीस व चित्ताजीपंत चिटणीत हे पदरी थोर मनुष्य असतां ॥ अहंकारपंत सबनीस याचे हवाली सर्व देहगांवचा कारभार केला ।। त्याचे धन्याचे घरचे मुत्सद्दी घरी बसवून नवीन मुत्सद्दी कामगार उभे केले ।। तें हैं चांगले नव्हे ।। विकल्पाजी महाजन व मोहाजी शेटे व कामाजी कोतवाल व क्रोधाजी नायकवाडी व द्वेपाजी जमेदार अधिकार जासद लोभाजी पोतनीस विकारपंत जकात दार मत्सर जी मेहेव्या कुतर्काजी गस्तवान उन्मत्तजी पार्ट ल कवद्विपंत कळकी भ्रमाजी शिपाई मदाजी देशपांड्या दंभाजी देशमन प्रपंचपंत मजुमदार मूर्खाजी हुजरे स्वार्थाजी खिजमतगार अविवेक पुराणीक अज्ञान मशालजी हे नवीन कामगार उभे केले ॥ व घरांतील पहिल्या दासी उभ्या केल्या ॥ त्या-आशा मनशा तृष्णा कल्पना ममता क याप्रीति भुली भ्रांती इच्छा वासना भ्रमणा कुबुद्धि निंदा अहंता चिंता निद्रा मोहनी ह्या कर्मका यादी । अहंकारपंत सबनीस याने उभ्या केल्या ॥ त्यांनी दरोवस्त परगणा बुडविला ।। आणि यमाजीपंत कमाविसदार यांचे घरी एकांतस्थळ स्थापन केलें ॥ त्यावरून हे ताकीदपत्र सादर केलें ॥ ते मुत्सद्दी व कामगार त्यागावे ॥ आणि सरकार हुजुरचे मुत्सही कामगार आहेत तर त्याचे हति काम द्यावें ।। मुत्सद्दी तपशील ।। शद सत्वभाव वैराग्य विवेक बोध परमार्थ आनंद समाधान निर्वैर स्वानभव धैर्य सत्य भजन पूजन हे कारभारी ।। आणि कार्यकर्त्या सुशीला मुबद्धि उन्मनी प्रतिष्ठा नवविधा मर्यादा शांति क्षमा दया नम्रता समाधि ह्या कार्यकर्त्या हे मुत्सदी यांचे हाती काम द्यावें ।। याजविषयी सरकारांतून ताकीद झाली आहे । तर लिहिल्याप्रमाणे वहिवाट करावी ।। सबनीस मजकूर याचे कामगार मुत्सद्दी ।। दरम्यान या कामांत आल्यास पारिपत्य केले जाईल ।। है स्पष्ट समजावें ।। सरकार कामगार उभे करावे याप्रमाणे वहिवाट करावी ।। एका जनादनी शरण ।। हे अशीवाद ।। हैं ताकीदपत्र ।। ( उभयतां जातात.)