पान:श्रीएकनाथ.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. एकनाथ-- ( हंसतो. ) काय ह्मणे शरीराबादेहून आलों आणखी अर्ज जिवाजीपंताने दिला. जिवाजीपंत हणजे बहुतकरून कायापूर किल्ल्याचे ठाणेदार असतलि? काय अर्ज करितात ? ( वाचतो.) अर्जदास्त अर्जदार ॥ बंदगी बंदेनवाज ॥ अलेकं सला म ॥ साहेबांचे सेवेशी ॥ बंदे शरीराबाद ॥ जिवाजी शेखदार ॥ बुधाजी कारकून॥परगणे शरीराबाद॥ किल्ले कायापुरी ॥ सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालों तों ॥ परगणे मजकुरी येऊन सरकार काम सुरू करावयास लागलों तो प्रगणे मजकूरचे जमेदार ॥ दंभाजी शेटे व कामाजी महाजन व मनीराम देशमुख व ममताई देशपांडी व क्रोधाजी नाईकवाडी ॥ ऐसे हरामजादे फार आहेत ॥ ते सरकार कामाचा कयासा चालू देत नाहीत ॥ दंभाजी शेट्या कचेरीस येऊन जोम धरून बसतो ॥ मनीराम देशमुख आपले काम परभार करून घेतो ॥ ममताई देशपांडीण इणें तमाम प्रगणा जेरदस्त केला ॥ कोधाजी नाईकवाडी यानें तमाम तफरका केला ॥ तो साहेबांपासून जरासंध चोपदार आला ॥ त्याने खबर केली की मागून यमाजीपंताची तलब होणार ॥ त्यास त्या धास्तीने तमाम प्रगणा वोस झाला ।। बितपशील कलम ।। डोळसवाडीस मात्र काहीं रुईझुई वस्ती राहिली ॥ कानगांव तो बंद झालें ॥ दोन्ही वेशींची कवाडे लागलीं॥ नाकापुरास वहाव सुटलें । तोंडापुर तें तफरका झालें ।। दंताळवाडी वोस पडली ।। दिवेलागणी देखील राहिली नाहीं ।। केंसगांवची पांढर झाली । शिरापुराचे लोक दरोबस्त थरथरा कापू लागले ॥ हातगांव कसल्याने जर्जर झालें । त्यांच्याने आतां कांही लावणी होत नाहीं ।। पायगांवची मेटें बसली ॥ ढोंपरीपुरची राहिली ॥ चरणगांव चाली सरली ॥ अपानद्वार वाहू लागलें ।। गुह्यस्थान भ्रष्ट जाहले ।। उठे पळू लागलें ॥ धीर धरवेना ॥ ऐसी परगण्यांत कीर्ति बुडाली ।। यावर सरकार काम सुरू करीत होतों ॥ तों यमाजीपंतांची परवानगी आली की॥ हुजूर येणें ।। जिवाजीपंत ठाणेदाराला ताकीदपत्र देतो त्याची अम्मलबजावणी करावी. - ताकीदपत्र ॥ समस्त राजकार्यधुरंधर परगणे शरीराबाद ।। सुमातेन लोली प्रवाहे ।। ताकीदपत्र दिले की कायापुरास जिवाजी