पान:श्रीएकनाथ.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एकनाथ--त्याने शपथ घातली आहे, ती तुझ्या ध्यानांत आहेना! गावबा-नाही तर आपण जेवावें, आणखी त्याला ह्मणावें मी उपाशीच आहे. गिरजाबाई--आता आपण दोघे जेवलों नाही, तर घरांत उद्भव जेवणार नाही. श्रीखंड्या जेवणार नाही. हा गावबा जेवणार नाही. गावबा--माझें जेवण चलींत गेले. एकनाथ-तुझी खुशाल जेवा. तुमच्याकडे काय आहे ? त्याने शपथ मला घातली आहे. मी तेवढा उपाशी राहतो. गिरजाबाई--पण कालची एकादशी आहेना ? आतां भुकेने जीव व्याकुळ झाला असेल ! गावबा--नाही तर तुमच्यावरचा मी बसतों उपाशी. तुह्मी खुशाल जेवा. आणखी ह्मणा की आह्मी गावबाला बदली दिला आहे ह्मणून. ( एकीकडे ) राण्या महाराच्या घरी यांनी आमटी भरकली हे जर मी गिरजाबाईला सांगितले तर ? पण नको इतक्यांत. एकनाथ--श्रीगुरूंनी मला ब्रह्मरस पाजला आहे. नामामृताचें भोजन मी नित्य करतो. माझी भूक नाहीशी झालेली आहे. आह्मी नित्यशः अमृतच जेवितो. अमृतानेच आंचवितो. निरालंबी शयन करतो. मन हेच तांबूल. त्याने आमचे तोंड रंगलेले असते. दुसरीकडे कोठे जात नाही. सोन्याच्या मूर्तीचे पूजन सोन्याच्याच फुलांनी करावें. नाही तर लहान मुलाची एकादशी. जेवलों काय आणि न जेवलों काय आझांला दोन्ही स्थिति सारख्याच आहेत. तुह्मीं कोणी आमच्याबरोबर उपास करूं नये. जा स्वयंपाकघरांत. गिरजाबाई-तें काही होणार नाही. आमी काही इकडे टाकून साफ जेवणार नाही. ( गावबा व गिरजाबाई जातात. एक मातारा एक कागद घेऊन प्रवेश करतो.) मातारा--महाराज, हा एक माझा अर्ज आहे. एकनाथ–तुझी कोठून आलां ? मातारा-शरीराबादेहून. आणखी हा अर्ज जिवाजीपंत शेखदाराने दिला आहे. आपण हा वाचावा,