पान:श्रीएकनाथ.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. गिरजाबाई--आतां तुला अक्कल तरी कधी येणार ? तुला अजून खोटे दागिने आणि खरे दागिने यांची कांही परीक्षा नाही. तुला नवरी तरी कशी येणार ? गावबा--हें पहा, मला वाटते नाटकांत जसे बायका खोटे डा- * गिने अंगावर घालतात, तसे हे डागिने खोटे आहेत. बाजारांत यांचे काही येणार नाही. कसें नाथमहाराज? एकनाथ-दागिने तिच्या माहेरचे. आझाला घेण्याचा संबंध काय ? त्या दागिन्यांवर तिची सत्ता. माझा काही संबंध नाही. गिरजाबाई--म्हणजे? मजवर सत्ता आहे तर मी ज्या आपल्या वस्तूंवर सत्ता करतें त्यांवर इकडची सत्ता नाही का झाली ? उमीचंद-बाईसाहेब बरोबर बोलल्या. एकनाथ तुह्मी चला बाजारांत. मोडा हे दागिने आणि टाका माझे रुपये देऊन. एकनाथ--हलवायाचे घरावर तुळशीपत्र ! तुझें काय जातें उमीचंद-अरे बाबा, आमच्यावर काही प्रसंग आला, आम्ही जर कैदेत जाऊ लागलों, तर आमची बायको एक गुंजभरसुद्धां सोने आपल्या अंगावरचे देणार नाही. आम्हांला लग्न करावयाचें हणजे दहा पांच हजार रुपये अगोदर बायकोच्या बापाजवळ स्त्रीधन ह्मणून ठेवावे लागते. तुझी बायको फार चांगली आहे. आपल्या नवऱ्याला सगळे दागिने अंगावरचे काढून देते ! गिरजाबाई-तुझी इतक्या चांगल्या गोष्टी सांगतां; मग तुझीच हे दागिने मोडून आणा जा.आपले रुपये काढुन घ्या आणखी चाकीचे-- गावबा-बाकीचे मला दक्षणा. उमीचंद-मला तुमच्या नव-याची आज्ञा पाहिजे. एकनाथ-मी आज्ञा करणार नाही, उमीचंद-बरें मी जातो. पण मी तुह्मास शपथ घातली आहे याचा विचार करा. ( जातो. ) गिरजाबाई-आतां नकतेच जेवावयाला बसणार तो कर्जदारानें गांठले. काय करावे माणसाने ? दागिने तर मोडावयाचे नाहीत. मग त्या वाण्याचे रुपये फिटणार तरी कसे ? आता उपास का करावयाचा !