पान:श्रीएकनाथ.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. श्रीपांडुरंगाची शपथ आहे. आपल्याला मोठा पांडुरंगाचा भक्त म्हणयीत असतो. आतां पांडुरंग तुला रुपये कसे आणून देतो, ते पाहतों. धर्माधिकारी--महाराच्या घरी आमटी भुरकतांना आम्ही याला प्रत्यक्ष पाहिला. आणखी येथे वाण्याबरोबर देवघेवीचा तंटा करीत बसला आहेच. बहुरूपी आहे, आणखी दुसरें काय! गावबा-(दागिने हातांत घेऊन धर्माधिकाऱ्यास उद्देशून ) महाराज, आपल्यास हे दागिने चांगले शोभतात. कारण आतां आपल्यांत आणि बायकांत कांहींच फरक नाही. एकनाथ आपल्यास येथेही दिसला. आपण आपल्या पणांत हरलात. या दागिन्यांबद्दल सातशें रुपये या वाण्याच्या पदरांत टाका. आमी तुह्माला वहिनी ह्मणन हाक मारीत जाऊं. अहो वहिनी, दादा कोठे गेले ! ( दागिने धर्माधिकाऱ्याच्या गळ्यांत घालतो.) - धर्माधिकारी-एकनाथ, ही का माझी चेष्टा चालविली आहेस होय ? मी कोण आहे हैं तूं जाणत नाहींस वाटते ! तुझी खोड मोडल्याशिवाय राहणार नाही. ( दागिने फेंकून देतो. रागाने सर्व ब्राम्हणांस घेऊन निघून जातो,) गाववा-धर्माधिकारी पळाले ! आम्हांला कसे भ्याले ! का वहिनी, कशी त्यांची फजिती उडविली ! एकनाथ-हा वेडा जेथें तेथें घाग करितो. याला काही समजत नाही. कोठे कसे बोलावें, कोठे कसे वागावें! उमीचंद-( उरावर हाणून घेतो, मोठ्याने ओरडतो.) रुपयांची वाट काय! एकनाथ - तुमचे रुपये दिल्याशिवाय मी अन्न खाणार नाही. मग तर झालेंना! गिरजाबाई--गावबा जारे. एवढे दागिने बाजारांतून मोडून आण जारे. गावबा-खरे सांगं का! यांचे फार झाले तर आठ बारा आणे येतील. हे दागिने खोट्या दागिन्यांप्रमाणे दिसतात. माझ्या बायकोला चरे आहेत. आईला सांगून तुह्माला आठ आण्यांचे पैसे पाहिजे असल्यास या घटकेस आणून देतो.