पान:श्रीएकनाथ.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. आहेत असे समजा. देण्याचे मात्र नांव नाही. गोकुळाष्टमीचा उत्सव, जनार्दनस्वामीची पुण्यतीथ, असल्या भाकड गोष्टींचे निमित्त करून लाडू-जिलब्या गिळायला पाहिजेत. परंतु उचापतीचे पैसे द्यावयाला नकोत. हा रोखा बरोबर आणला आहे. आतां मी फिर्याद केल्याशिवाय राहत नाही. (एकनाथ व गिरजाबाई प्रवेश करितात.) एकनाथ-या शेटजी, तुझी फार हेलपाटे घालतां याबद्दल मी मोठा लाचार आहे. उमीचंद-लाचार आहेस तर माझे रुपये फेंकून देईनास. रस्त्याला फेंकून दे. मी आपला गोळा करून घेऊन जातो. एकनाथ-संसारांत वित्त, परमार्थात चित्त, आणखी शरीरांत पित्त, नसलें की फजिती! उमीचंद-तुझी साऱ्या गांवांत फजिती करतो. माझे पैसे बुडवावेत अशी तुझी इच्छा आहे. आज पैसे घेतल्याशिवाय राहणारच नाही. एकनाथ-पैसे असून कां मी देत नाही ? नसल्यावर कोठून द्यावे ! - उमीचंद-बायकोच्या अंगावरचे दागिने मोड. लोकाला काय उपकार सांगतोस? गिरजाबाई का झालें ? माझें तरी आपल्यास पहिल्यापा. सून हेंचं सांगणे आहे. हा वाणी भला मनुष्य दिसतो. हे घे तुला माझ्या अंगावरचे दागिने सातशे रुपयांबद्दल. ( दागिने काढून त्याला देते.) उमीचंद--मला घेऊन काय करावयाचे आहेत ? बाजारांत जाऊन मोड. आणखी आपल्या बापाचे रुपये सातशें आणन है अंगावर दागिने घालायला गोड लागतात. लोकांचे पैसे देणे मात्र गोड लागत नाही. (धर्माधिकारी, इतर ब्राम्हण व गावबा प्रवेश करितात.) पहाहो सर्व ब्राम्हणमंडळी, याने सातशे रुपयांची उचापत घेऊन ब्राम्हणभोजने घातली. मला याने रोखा लिहून दिला आहे. या घटकेस याने माझे रुपये मला यावेत. माझे रुपये मला पटन रोखा परत घेतल्याशिवाय याने जर अन्नग्रहण केले, तर याला