पान:श्रीएकनाथ.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. ९५ डीत माझ्या डोळ्यासमुख असच रहा. यासनी आपली किंमत नाही. एक माणूस दोन जागी आपुण दावलत, यातल इंगीत मी जानल. आपल्याला मी सोडनार नाही. आपल्याला मी खास वळखल. धर्माधिकारी-अरे त्याला धरून बस, ह्मणजे तो तुला ब्राह्मण करील. महारामांगांची प्रतिष्ठा वाढत चालली. पाहून घेतों तुझा चमत्कार. चला, याच्या घरी. याला आतां घरांत येऊ द्यावयाचे नाही. असाचे असा गांवाबाहेर हाकून देतो. गावबा--पण मी म्हणतों धर्माधिकारीबुवा, आतां तुह्मी एकनाथाच्या घरी गेलांत, आणखी तेथें तुम्हांस प्रत्यक्ष एकनाथ दिसला, तर तुम्ही त्याला काय बक्षीस कराल; अथवा तुम्ही आपल्या स्वतःस कोणता दंड करून घेण्यास तयार व्हाल ? धरणीधर--हाच प्रश्न मी सुद्धा तुम्हांला करणार होतों. अहो आम्ही भोजन करीत असतांना त्याला प्रत्यक्ष पाहिले. धर्माधिकारी--तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे मला जर तेथे पुनः एकनाथ भेटला, तर मी स्वतःच दंड म्हणून सहस्रभोजन घालीन. आणखी एकनाथाला बक्षीस इतकेंच की, त्याला आजपासून त्यार्ने कांहीं अनन्वित जातिबाह्य कर्म केल्यास त्यास प्रायश्चित्त देणार नाही. तो पावनच आहे, असे समजेन. चला आतां त्याच्या घरी, (सर्व जातात.) प्रवेश ५ वा. स्थळ-एकनाथाचें घर. (उमीचंद प्रवेश करितो.) उमीचंद- ( एकीकडे ) मला या एकनाथाचा स्वभाव बिलकुल आवडत नाही. याला काही व्यवहार नाही. संसार नाही. उद्यांची काळजी नाही. पैसे देण्याची इच्छा नाही. घेण्याला मात्र पाय पुढे. माझे सातशे रुपये उचापतीबद्दल त्याच्याकडून येणे आहेत. देण्याचे कांहीं नांव आहे काय ! मागायला गेलें म्हणजे म्हणतो रुपये आले की, देऊन टाकतों, शेटजी तुझी बेफिकीर रहा. रुपये आपल्या घरांत