पान:श्रीएकनाथ.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. गावबा-संभाळा, नाही तर जादूने तुम्हांला आम्हांला गाढव बनवायचा ! धर्माधिकारी-तें कांही नाही. तुम्ही पाळत बरोबर ठेविली नाही. त्याने तुमच्या हातावर तुरी दिल्या. आम्ही खात्रीने सांगतों की तो स्वतःच्या घरी मुळीच नाही. येथे येऊन महाराच्या घरी तुकडे खातो आहे. धरणीधर-आमचे डोळे फुटले म्हणावयाचे. अहो, आम्ही त्रिवर्ग सारखे त्याच्या शेजारी बसून त्याच्या घरी जेवलों, आणखी तुम्ही आम्हांला खोटें करितां, तेव्हां आतां तुझांला ह्मणावें तरी काय ? एक मनुष्य दोन ठिकाणी दिसतो, हें आश्चर्य नव्हे काय ? हातच्या कांकणाला आरसा नको. आमी याला येथे संभाळतो. तुह्मी आतां त्याच्या घरी प्रत्यक्ष जा आणि आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून घ्या. जानकाई-पन मी ह्मनते आमच्या घरी नाथ महाराज जेवल, ते बामन हायती आन तुझी बामन हायनी, मंग आता तुलाला जेवाया काय हरकत हाय ? खाता का वाइच भाजीभाकर ? त्रिविक्रम-जास्त बोललीस तर शिवून मारीन. तोंड आटप. तूं महारीण आहेस, याचा विचार केलास काय ? ज्याने त्याने आपल्या पायरीने असावें. सान्या गांवांत जे आहे ते महारवणी झालें आहे. आपण सुद्धा आतां प्रायश्चित्त घेतले पाहिजे. गाववा-आमालाही थोडेसें या, ह्मणजे अंगांत दंगात लोमनों लोमना-मत्राची कशी बहार ! आणखी चिखलाने अंगें भरवायची आणखी शेणाने-आणखी भस्माने-आणखी मिशा काढायच्या ! नाहीतर मिशा काढायचे प्रायश्चित्त नको मला. कारण माझी आई आणखी मी सारखाच दिसतो. आईला मी एकदां विचारले, मिशा का ह्मणून काढतात ? तेव्हा ती ह्मणाली, मिशा जे लोक काढतात, त्यांना क्रोध नाही असे समजावे. राण्या-(एकनाथाचे पाय धरून ) महाराज, आपुन इथूनशान जाऊ नका. हे बामन लयी रागावले हायती. बाहेर गेल्यावर हे आपल्याला मारत्याल. मी आपल्याला जाऊ देनार नाही. माझ्या झोप मजाव.