पान:श्रीएकनाथ.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. ९३ डिला जाणा ॥ वस्ती करूं कायापुरीच्या खुणा ॥ सांगेन की जी मायबाप ॥२॥ आणि जोहार जी मायबाप जोहार ॥ मी पार्वतीचे गळ्यांतील हार । ईश्वराचा पूर्ण भार ॥ त्याचा करितों कारभार ॥ मज नफराचे शिरीं की जी मायबाप ॥३॥ अखंड द्वारी पडिला असतो ।। प्रेमाचा तुकडा मागून खातों ॥ धन्याला दुवा देतों की जी मायबाप ॥ ४ ॥ तुह्मी मुळींचा ठाव सोडूं नका ॥ विसरलयास पावाल धक्का ॥ अंतकाळीं की जी मायबाप ॥५॥ वस्ती करूं आह्मी साचे॥ समस्त कुळवाडी नगरीचे ॥ पैसे टाका धन्याचे ॥ बाकी थकवू नका की जी मायबाप ॥६॥ असामी बारा दिधली ॥ शेवटी द्वाही विझाली ॥ एका जनार्दनी आज्ञा केली की जी मायबाप ॥७॥ (विश्वेश्वरभटजी, सोमनाथ, धरणीधर शास्त्री, गावबा प्रवेश करितात.) विश्वेश्वर-अहो हे केवढें आश्चर्य ! आमी इतका वेळपावेतों एकनाथाच्याच घरी होतो. इतकेच नाही, परंतु त्याच्या घरी भोजनाला बसून आह्मी यथेच्छ हात मारिला. गावबा-हीं पाहीलीतका आमची पोटें ? आझी आपल्या बेंबींची उखळे केली होती. धोतरें ढिली करून करून विश्वेश्वरभटजी, सोमनाथ महाराज, धरणीधर शास्त्री यांनी खूप ताव मारला. पण बिचाया धर्माधिकान्याला आणखी या त्रिविक्रम पंडिताला मात्र फाकया बसला. आपणांला मी भोजनास बोलावण्यास आलो आहे. तुम्हां दोघांसाठी एकनाथमहाराज खोळंयून बसले आहेत. हे एक एकनाथ महाराज कोण आहेत ? आपल्याला साष्टांग नमस्कार करितों. राण्याच्या घरी इकडे पाटावर बसून जेवतां, तिकडे स्वतःच्या घरी आपली वस्ती आहेच. याला साक्ष आमचे आम्ही. नारदाला द्वारकेंत स्वतःला बायको मिळावी म्हणून शोध करीत असतां घरोघर रुण दिसला, तसे आम्हांला नाथ महाराज दिसायला लागले ! सोमनाथ-काही नाही. हा सारा बीरमंत्र आहे. दौलताबादेस यवनाच्या पदरी हा काही दिवस होताच. तेथेंच हा जादू शिकून आला आहे, आणखी दुसरे काय ?