पान:श्रीएकनाथ.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. कायमचा बहिष्कार घालतों. तुझ्या मुलांना महारांच्या मुली बायका कर. तुला ज्या मुली होतील त्या महारांनाच दे. अधमा, चांडाळा, माझ्या अंगाचा संताप-डोम झाला आहे !!! एकनाथ-अहाहा । हा भावाचा भात, वैराग्याचे वरान्न आणि हे शांतिब्रम्हाचे तूप यांचा एक घास तर घ्या. धर्माधिकारीबुवा, तुझी पुष्कळ ठिकाणी मिष्ट मिष्ट पक्वान्ने पोट तट्ट होईपावेतों भरली असतील, पण यांतला जर एक घास खाल्ला, तर मला वाटते तुम्ही माझ्या पत्रावळीवरच झडप घालाल. त्रिविक्रम--चल मूर्खा, वाचाळपंचविशी चालविली आहेस. तुझ्या भाषणांत काही अर्थ आहे काय ? तुला आतां नातवंडे होऊ लागली. पांढन्यांचे काळे होऊ लागले. आतां दिवसेंदिवस तूं इतका भकला आहेस की, आमच्या देखत तूं प्रत्यक्ष राण्याच्या घरी जेवीत आहेस. तुझ्यापेक्षां तो गावबा शहाणा म्हणावयाचा. तूं कांहीं जातीचा अस्सल ब्राम्हण नाहींस, अशी आमची पक्की खातरी झाली. तूं यावेळी आमच्या गांवांतून चालता हो. बऱ्या बोलाने चालता हो नाही तर याच पावली तुला हाती धरून बाहेर काढूं, कधी सोडणार नाही. तुझे आईबाप महार होते का ? एकनाथ-कौरवपांडवांच्या युद्धाचे वेळी प्रथमदर्शनींच अर्जुनाला जबरदस्त संशयरूपी भुताने झडपलें. तसें या ब्राम्हणांना संशयाने झडपलें आहे. मी ब्राम्हण आणि हा महार हा जब्बर संशय. हे संशयरूपी पिशाच फार कठीण ! हे हरिहराला दाद देत नाही. चारी वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे यांना पत्ता लागत नाही. अठ्याऐशी सहस्र ऋषि तपश्चर्या करून थकले; परंतु ज्ञानदेव ह्मणतात, बम्हादिका लक्षा नये, कल्प गेली युगायुगे, तो गवळीयाच्या ओसंगे, निघाला गे माय ।। १ ।। आतां मी कोण, ते तुम्हांला सागतो: जोहार. जोहार मायबाप जोहार ॥ तूं कोण गांवींचा माहार ।। पुसाल जरी साचार ॥ तरी सादर परिसा की जी मायबाप ॥१॥ माझा निराकार मुळींचा ठिकाणा ॥ भक्तांसाठी सा