पान:श्रीएकनाथ.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९१ अंक ४ था. दार लाव. कौरव पांडव मिळाले, कुरुक्षेत्री युद्ध मांडिलें, अठरा अ. क्षौहिणी दिवटे भले, नाचती रणकल्होळी, बया दार लाव. बौध्यावतार घेऊन, विटे समचरण ठेवून, पुंडलिक दिवटा पाहून, तयाचे द्वारी गोंधळ मांडिला, बया दार लाव. आणिक दिवटे अपार, निवृत्ति ज्ञानदेव सोपानदेव खेचर, मुक्ताई जनाबाई विठोबा गोरा कुंभार, रोहिदास चोखा सजन नाचती, बया दार लाव. सावता नामा दामा जाण, नारा मादा गोंदा विठा कबीर कमाल पूर्ण, सेना जनमित्र, नरसि ब्राह्मण, दिवटे तिष्ठति, बया दार लाव. एका जनार्दनी शरण, विठ्ठलनामें अंबा जाण, पुंडलिक दिवटा अवलोकून, निवांतरूपें बैसली. ( राण्या महाराचा हात धरून ) अरे राण्या, तूं मला आज द्वादी सोडावयाला येथे बोलाविलें होतेंसना ? मग मला भोजनास वाढावयाचे सोडून तुम्ही दोघे गळफांस लावून घेऊन प्राण देण्याचा प्रयत्न काय म्हणून करीत होतां ! राण्या-महाराज, आझाला अस वाटल की, आपुन आता खास आमच्या गरीबाच्या झोपडीत येत नाही. आपल्याला दुसर बामन येऊ देनार नाहीत. मनूनशान आझाला अक्षी वाईट वाटून आम्ही दोघबी परान देन्याला तयार झालो. जरास तुह्मी विळान आला असता, तर आमच दादलाबायकोच मुडदच पाहिल असत. एकनाथ-अरे पण देव असे करणारच नाही. असो, ब्राह्मणांचा जाच सोसून तुमच्या घरी मी भाजीभाकर खाण्याला आलों आहे. बाम्हणांचा जाच देवालासुद्धा झाला तेथे आपला पाड काय! तुम्ही आतां मला लौकर वाढा, म्हणजे मी जेऊन जातो. । जानकाई-महाराजानी हत पाटावर बसाव. मी समदी तयारी केली हाय. आज मला किती आनंद झालाय म्हनूनशान सांग ! मला अस वाटल की परत्यक्ष भगवान पांडुरंग जसा चोख्याच्या घरी जेवाया गेला, तसाच माझ्या घरी आला आहे. ( एकनाथ भात कालवून खाऊं लागतो. धर्माधिकारी, त्रिविक्रम शास्त्री प्रवेश करितात. एकनाथ आमटी भुरकतो.) धर्माधिकारी-महाराचे अन्न आवडी आवडीनें भक्षण करीत आहेस याच्यापेक्षां पोटांत शेण का भरीनास ? नीचा, तुला आतां