पान:श्रीएकनाथ.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. एकवीस स्वर्ग मुकूट झळाळी, बया दार उघड, बया दार उघड, (उभयतां फांस लावून घेतात.) राण्या-(अभंगाच्या चालीवर. ) अलक्षपुर भवानी दार उघड बया, माहूर लक्ष्मी दार उघड बया, कोल्हापुर लक्ष्मी दार उघड बया, तेलंग लक्ष्मी दार उघड बया, तुळजापुर लक्ष्मी दार उघड बया, पाताळ लक्ष्मी दार उघड बया, कानाड लक्ष्मी दार उघड बया, आठ भुजा लक्ष्मी दार उघड बया, पंढरपुर निवासिनी दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया. जानकाई-(अभंगाच्या चालीवर, ) चारी पुरषार्थ गोंधळी, सनकादीक तेथे संबळी, तेहतीस कोटी भुतावळी, दिवट्या पाजळूनी तिष्ठती. बया दार उघड. वेताळ फेताळ खंकाळ, मारको मेसको मैराळ, जानाई जोखाई क्षेत्रपाळ, म्हैसासुर दैत्य माजला सबळ. अबबब, पीडा केली अहो बया दार उघड. राण्या--(अभंगाच्या चालीवर ) मच्छाईबया दार उघड, कच्छाईबया दार उघड, वन्हाईबया दार उघड, नरसाईबया दार उघड, वामनाईबया दार उघड, परसाईबया दार उघड, रामाईबया दार उघड, रुष्णाईबया दार उघड, बोधाईबया दार उघड, कलंकाईबया दार उघड. (दोघे एकदम ओरडून बोलतात). दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया. ( उभयतां जोराने गळफांस ओढतात. एकनाथ प्रवेश करितो. गळफांस हिसकावून घेऊन दूर फेंकून देतो.) एकनाथ—(अभंगाच्या चालीवर ) दैत्य कुळी हिरण्यकश्यपु जन्मला, तेणें तुझा भक्त गांजीला, तें न पाहवे तुजला, त्या उग्ररूप धरिलें, बया दार लाव. त्वां क्रोधे स्तंभ फोडून, नारसिंहरूप धरून, दत्यासी वधून, प्रल्हाद दिवटा रक्षिला, बया दार लाव. तूं वामनरूप धरून, बळीस पाताळी घालून, शुक्राचा एक नयन फोडिलास, बया दार लाव. परशुरामरूप धरून, सहस्रार्जुनास वधून, मातेचे शीर छेदून क्षत्रियकूळ निवटिलें, बया दार लाव. सीतेचेनी कैवारें, रावण मारिला सहपरिवारें, अठरा पदमें वानरें, गोंधळ मांडिला लंकेशी, बया