पान:श्रीएकनाथ.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. राण्या-नाथमहाराजांनी सांगितल की विठोबाला समद्या जाती सारख्याच हयती. त्येला भक्ति पाहिजे. जाती नको. मानसाच्या वागनुकीवरून जाती पडल्या. आपुन कांहीं मास कधी खात नाही. एकादशीला कांहीं खात नाही. एकनाथासंग पंढरीची वारी करतो. रात्रंदीस ते जस सांगतात तस करतो. मंग इकत करून जर ते आता बारस सोडाया आमच्या खोपटात येनार नाहीत, तर मंग हा परान असला काय आन नसला काय सारखाच. याच्यापुन हा परान या देहीतून गेला तरी बी हरकत नाही. जानकाई-अन मंग मी तरी तेच मनते की समद्या लोकात यवढ तर व्हईल की महाराच एक जोडप एकनाथ त्येच्या घरी जेवाया गेला नाही म्हनूनशान आपल्या गळ्याला फास लावूनशान मेल. राण्या-तूं कशाला मरतेस ? माझ्या माग तूं रहा. चांगलासा दादला पाहून म्होतूर लाव. चांगल दागीन मिळत्याल. चार पोर होत्याल. (मुरका मारते.) देखनी बी चटकदार हैस. मला मातर आता जीव ठेवायचा नाही. माझ्या पायी तूं कशाला मरतेस ? जानकाई-तुमच्या माग रांडाव होऊनशान मला काय करायच हाय ? जलमभर तुमच्या संगतीन मीठभाकर खाऊनशान आन धोंगडा नेसूनशान दीस काढल. आतां म्हातारपनी ढोबळा मनी म्होतुर लावून चट्टी पट्टी करून त्याला भुलवूनशान काय मिळनार हाय ? सात सात जलम मी तुमची बाईल होईन. तुमच्या संग मी मेले तर आपल्याला संगच जाळतील. आन मंग देव मला तुमचीच अस्तुरी करील. मी तुमच्या संगच मरनार.. राण्या-आन तर दोन चराट, घेऊ गळ्याला फास लावूनशान, आन देऊ परान. कालपुन एकादशीमुळ पोटामंधी आनबी नयी, तवा परान जान्यालाबी काही उशीर लागनार नाही. जे बया आई पंढरपुरचे माझे महालक्ष्मी विठाबाई आई, आता तुझ दार उघड. या राण्या महाराला आन त्याच्या आवाला घे पोटात. जानकाई-( अभंगाच्या चालीवर.) दार उघड, बया दार उघड. बया नउखंड पृथ्वी तुझी चोळी, सात पाताळा पाऊले गेलो,