पान:श्रीएकनाथ.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. कसा नहि आता ? तीन दफे आपके तनपर मय् थूका, लेकिन आप मानिंद दिवारके खडे रहेथे, बडी ताजूबकी बात. श्रीखंड्या-माझ्याने आतां संताप सहन होत नाही. मी या दुष्ट मनुष्याला पायाखाली तुडवणार. राखुंडी किती फुकली तरी जसा दिवा लागत नाही, तसा मी यांना कितीही संताप आणण्याचा प्रयत्न केला, तरी तो व्यर्थच जातो. माझें करणें वाऱ्यावर तरवारीचा आघात केल्याप्रमाणे किंवा पाण्यावर काठी मारल्याप्रमाणे आहे. एकनाथ-त्याचे माझ्यावर असंख्य उपकार झाले आहेत. मला गंगेची किती तरी स्नाने त्याच्या कृपेने घडली. आपण माझ्या घरी भोजनास चलावें. नाही तर श्रीखंड्या असें कर की यांना येथे आपल्या घरून दोन माणसांचे अन्न वाढून आणून दे, हणजे यांची क्षुधा शांत होऊन अन्नाऐवजी तंबाखू फाकणार नाहीत. शिद्दी-तोबा तकसीर मुजे बहुत आपसोस मालूम होता. मय् आपने दिलकरंज खीचतां हूं मुजे माफ हो. आप बडे साई हो पीरोमुरशद हो. ( सलाम करून ) मुजे आप् इतना कहिना के जिसे हम अल्ला, खुदा और महमद कहते उस्से आप क्या कहते. और ये दोनो देव येक हय् या जुदे. एकनाथ-( त्याचा हात धरून ) अभंग. ख्याल किया मछलीवाले वल्ले ॥ धुंडी दर्याव गोविंद महंमद ॥ध्रु० ॥ शंकासुरदैत्य मारि या वल्ले ॥ लायो चारी बेद महंमद ॥ १॥ खेल खेलावे आवे गोविंद महंमद ॥ गोविंद महंमद ॥२॥ सबदेव स्याने नरसिंह बडा या वल्ले ॥ भेदा मृगजस्तंभ महंमद ॥३॥ हिरण्यकश्यप दैत्य मारिया वल्ले ॥ रखा भक्त प्रल्हाद महंमद ॥४॥ बळिराम सत्वा आगळ वल्ले ॥ उसे दिया पाताल राज्य महंमद ॥ ५॥ खुजी सुरत ठेंगणी वल्ले ॥ फिरे फकीरी हाल महंमद ॥६॥ परशुराम माको मारी या वल्ले ॥ फत्ते किया बापका बोल महंमद ॥७॥ दशरथ का रामराना वल्ले ॥ राज्य दिया बिभीखन