पान:श्रीएकनाथ.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. एकनाथ-छे, छे, असें अविचारीपणाचे कृत्य आपण करूं नये. कदाचित् त्याने जाणून बुजून असें काम केलें नसेल न जा. णून केलेल्या कामाबद्दल त्याला आपण दोषी ठरवू नये. मनोनिग्रह करण्याची ही संधि परमेश्वराने आपल्यास आणून दिली आहे. अशी संधि पुनः येणार नाही. श्रीखंड्या-आपल्या अंगों पृथ्वीप्रमाणे क्षमा पूर्ण बाणलेली आहे. तिच्यावर कितीएक मळमूत्र टाकितात, कितीएक तिचे पूजन करितात, परंतु ती कोणावर लोभ करीत नाही किंवा क्षोभही करीत नाही. याप्रमाणे आपली चित्तवृत्ति आहे. चला आपण गंगेवर पुनः नानास जाऊं. ( उभयतां जातात.) शिद्दी--ये बम्मन् व्हायात् हय्. खाली तमासा दिखलाता हयू. सब् रियासत् बादशहाकी हम बादशहाके गुलाम हय्. ये हमसे जबरदस्त कैसा बनाता हय् देखता हूं. कैसा सो दफे नवीपर जाकर नाहता हयू सो मुजे देखना हय् ( एकनाथ व श्रीखंड्या प्रवेश करितात. एकनाथाच्या अंगावर शिद्दी पुनः धुंकतो.) श्रीखंड्या-वशिष्ठानें अत्यंत क्षमा धारण केली, त्यामुळे त्याचे शंभर पुत्र विश्वामित्राने ठार मारिले. जमदग्नीनें क्रोधाचा त्याग केल्याबरोबर सहस्रार्जुनाने त्याचा सहज वध केला. तशी आपली स्थिति होणार आहे. आपण मला आज्ञा करा की, मी याला खूप मुष्टिमोदक खावयाला देतो. ___एकनाथ-त्याला आपल्या रुतीचा पश्याताप आपोआप वाटावा असा उपाय योजण्याचे सोडून आपण त्याला शिक्षा करावी हे काम बरोबर नाही. त्याच्या प्रत्येक थुकण्याने मला अनायासें गंगेचे स्नान होत आहे. हे त्याचे उपकार माझ्या हातून कसे फिटतील याची मला काळजी आहे. चला आपण गंगेवर पुनः स्नानास जाऊं. (उभयतां जातात.) शिद्दी-दो दफे मय् उसके तन्पर थूका, लेकिन ये बिलकूल गरम नहि हुवा. और एक दफे वैसाहि करेगे. क्या नतीजा होता हय्, सो देख लेंगे. मय् अव उसे कुच वात् करेगा. ( एकनाथ व श्रीखंड्या प्रवेश करितात. पूर्वीप्रमाणे शिद्दी धुंकतो.) आपकू कुच् गुस्सा