पान:श्रीएकनाथ.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. असिपदी एकत्र जेथें होती ॥ स्वानुभवें स्नान हेचि गुप्त स्थिति ॥ झालि० ॥१॥ सद्बुद्धीचे घातलें शुद्धासन ॥ वरी दया । सहरूची कृपा पूर्ण ॥ शम दम आंगीं विभुती चर्चिले जाण ॥ मुखी उच्चारी केशव नारायण ॥ झालि० ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां ॥ ममता मातारी सा मरोन गेलि तेव्हां ॥ भक्ति बहिण धांवोनी आली गांवा ॥ आतां संध्या करूं मी कैंची केव्हां ॥ झालि०॥३॥ सहज कमै ती जालीं कृष्णार्पण ॥ ऐसें ऐकतां नीवती साधुजन ॥ जन नव्हे अवघाचि जनार्दन ॥ एका जनार्दनीं लाधली हेचि खूण ॥ झालि० ॥४॥ - (खडावा पायांत घालतो. धौतवस्त्रे परिधान करितो.) श्रीखंड्या, अरे अशा तापलेल्या वाळूत तूं कावड घेऊन शंभर वेळां येतोस, तुझे पाय कसेरे पोळत नाहीत ? हे बघ, आजपासून यावेळी तूं पाण्याला येत जाऊं नको. मला वाटतें रोज पांचशे घागरी पाणी पुरत नसेल. काही एक वेतन न घेतां इतके जिवापाड कष्ट माझ्या घरी करितोस, हे पाहून माझा जीव तिळतिळ तुटतो... श्रीखंड्या-महाराज, आपण यत्किंचित् श्रमी होऊं नका. माझे पाय मुळीच पोळत नाहीत. वाऱ्याच्या योगाने जसा गलबत । च्या अंगी वेग उत्पन्न होतो, तसा मी जो जो अधिक अधिककाम करतो, तो तो मला जास्त करण्याचे स्फुरण येते. मी कधी थकत नाही आपण निष्काळजी असावें. (एक शिद्दी प्रवेश करितो. तो एकनाथाच्या अंगावर धुंकतो.) श्रीखंड्या--महाराज, आपल्यास विटाळ झाला. हा शिवी फार फाजील मनुष्य दिसतो. आपली आज्ञा असल्यास मी याची गुरमी जिरवून टाकतो. टाकू का बत्तिशी पाडून, म्हणजे पुनः तंबाखू खाऊन पिचकारीच मारता येणार नाही!