पान:शेती-पशुपालन.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लागवड करणे : जमीन तयार करून जे पीक जमिनीत घ्यावयाचे असते त्यावर बीजप्रक्रिया करून लागवडीयोग्य केल्यानंतर त्याची लागवड कोणत्या पद्धतीने करावयाची हे ठरविले जाते. लागवड करण्याच्या पद्धती : (१) टोकण पद्धत (२) पेरणी पद्धत (३) फोकण पद्धत. निदेशकांनी लक्षात घ्यावयाच्या बाबी : (१) जमीन व जागेची अगोदर निवड करणे, (२) जमिनीचे मोजमाप करणे. (३) बिया वजन करून घेणे. (४) विद्यार्थ्यांचे गट करून स्वतंत्र जबाबदारी देणे. (५) पिकांची लागवड केली असल्यास पाण्याचे नियोजन करणे. (उदा. गटानुसार वाटून देणे.) (६) बाजारपेठ शोधणे. (७) मुलांना या प्रात्यक्षिकासंबंधी माहितीपट दाखवण्याची व्यवस्था करणे. पूर्व तयारी : प्रात्यक्षिक सुरू करण्यापूर्वी त्या प्रात्यक्षिकास लागणारी सर्व साधने व साहित्य जमा करावीत. उदा. गंधक, गूळ, बियाणे इ. (प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी स्वत: अगोदर प्रत्यक्ष करून पहावे.) उपक्रमांची निवड करणे. (कोणतेही एक):(१) शेतात कोथिंबिरीचे पीक घेणे. (२) शेतात भुईमुगाचे पीक घेणे. (३) मेथीचे पीक घेणे, (४) रोप वाटिका बनविणे. (५) बीजप्रक्रीया केलेल्या बीयाण्याची उगवणक्षमता मोजणे. (क) शेतात एक पीक घेणे. १.शेतात एक पीक घेणे. अपेक्षित कौशल्ये: (१) जमिनीची मशागत करणे / करता येणे. (२) वाफे करण्यास शिकणे/येणे. (३) बियाण्यांची निवड करता येणे. (४) बीजप्रक्रिया करता येणे. (५) पिकांची लागवड करता येणे. (६) खतांची मात्रा देणे. (७) आंतरमशागत (खुरपणी)करणे. (८) पीक काढणे. साहित्यः बियाणे, पाणी इत्यादी. साधने : टिकाव, कुदळ, खोरे, घमेले, झारी, खुरपे, विळा इत्यादी. कृती: (१) सुरुवातीस जमीन मोजून घ्या. (२) मोजलेल्या जमिनीची टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने खोदणी करून माती भुसभुशीत करा. (३) खोदकाम केलेल्या जागेतील दगड व गवत वेचून जमीन स्वच्छ करा. (४) आवश्यकतेनुसार त्या जागेत वेगवेगळी खते टाकून ती मातीत चांगली मिसळा. (५) पिकाच्या आवश्यकतेनुसार जमिनीमध्ये सरी-वरंबा /गादी वाफा / सारे/आळे इ. करून घ्या. (६) बीजप्रक्रिया केलेले बियाणे योग्य त्या अंतराने लावा/पेरणी करा. (७) पेरणी करून झाल्यावर त्या जमिनीला ३ ते ४ इंच एवढे पाणी द्या. (८) चार ते सहा दिवसांनी पुन्हा २ ते ३ इंचाएवढे पाणी (आंबवणी) द्या. (९) आवश्यकतेप्रमाणे ६ ते ८ दिवसांच्या फरकाने या रोपांना पाणी द्या. (१०) रोपे २१ ते २८ दिवसांची झाल्यावर त्यातील गवत खुरप्याच्या साहाय्याने खुरपून काढा, (११) पुन्हा पाण्याच्या पाळ्या व आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्या. (१२) पीक तयार झाल्यानंतर त्याची काढणी करून घ्या.