पान:शेती-पशुपालन.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मातीच्या कणांचा आकार : (१) चिकणमाती - ०.०००२ mm.पेक्षा लहान (२) गाळ (सिल्ट)-०.०२२ - ०.०५ mm. (३) वाळू -०.५ mm. - २ mm. (४) खडी - २ mm. पेक्षा मोठे. पिकांच्या गरजेनुसार जमिनीची मशागत करून वेगवेगळ्या प्रकारे पिकांची लागवड करत येते. उदा. (१) सरी पद्धत - ऊस इ. (२) वाफे पद्धत -भाजीपाला (अ) सपाट वाफा – ज्वारी, कडधान्ये इ. (ब) गादी वाफा – भाजीपाला रोपे (३) आळे पद्धत : उदा. फळझाडे इत्यादी प्रकारांत जमीन पीक लागवडीसाठी तयार केली जाते. विविध शेती अवजारांचा वापर करून जमीन यांत्रिक व मानवनिर्मित अशा दोन पद्धतीने तयार केली जाते. जमीन तयार करताना मुख्यत: पिकांच्या कालावधी, पिकांचा मुळांची रचना, पाण्याची उपलब्धता इ. बाबींचा विचार करावा लागतो. 'ब) बीजप्रक्रिया करणे. १. बीजप्रक्रीया करणे : ज्या बिया लावायच्या आहेत त्यांचे जमिनीमधून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच बीयांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी किंवा उगवण काही विशिष्ट काळासाठी थांबवण्यासाठी त्या बियांवर विशिष्ट अशी प्रक्रिया केली जाते, त्यास बीजप्रक्रिया असे म्हणतात. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते, उगवण क्षमता वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते, जमिनीतील अपायकारक जीवाणुंपासून संरक्षण होते व उत्पन्न वाढते. अपेक्षित कौशल्य : बीजप्रक्रिया करणे. साहित्य : बियाणे, बुरशीजन्य औषध , ॲझोटोबॅक्टर , रायझोबियम , सल्फर (गंधक), पाणी इत्यादी. साधने : घमेले, बादली, रद्दी पेपर , हातमोजे इ. कृती :(१) सुरूवातीस बिया घमेल्यात घ्या. हातात हातमोजे घालून बियांवर ५% गुळाचे पाणी शिंपडा. नंतर त्यांवर बुरशीनाशक औषध, संजीवक, सल्फर (गंधक), इ. औषधे योग्य प्रमाणात चोळा. (२) बियाणे थोडा वेळ सावलीत वाळण्यास ठेवा. बिजप्रक्रियेचे फायदे : (१) बियांची उगवणक्षमता वाढते. (२) रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. (३) पिकाच्या उत्पादनात वाढ हते. (४) रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते. दक्षताः(१) बियांना रसायने लावून झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. (२) बियांना रसायने लावताना ती योग्य प्रमाणात लावावीत. (३) गुळाचे पाणी शिंपडताना त्या बियांना पावडर चिकटेल एवढेच ओले करावे. (४) बियाणे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच पेरणीसाठी वापरावे. आपणांस हे माहीत आहे का? (१) बटाटे बियाणे (बेणे) जिबरेलिन्स अॅसिडमध्ये भिजवून लावल्यास लवकर उगवण होते. (२) ऊसाचे बियाणे (बेणे) जिबरेलिन्स अॅसिडमध्ये भिजवून लावल्यास लवकर व चांगले उगवते. (३) कांद्याची रोपे लावण्यापूर्वी इथरेल-द्रावणात घालून लावल्यास मर कमी होते उगवण चांगली होते. बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती: (१) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे. (२) बी थंड पाण्यात भिजत ठेवणे. (३) कोरड्या बियांना औषध चोळणे. (४) रोपांची मुळे द्रावणात बुडवून ठेवणे. (५) बी कठिण पृष्ठभागावर घासणे.