पान:शेती-पशुपालन.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२.बीजप्रक्रीया करून परिणामांचं विश्लेषण करणे. साहित्य : भुईमुग बी, रायझोबियम जीवाणु, गुळ, पाणी इ. कृती : (१) भुईमुगाच्या ५० बीया घेवुन त्याचे दोन सारखे भाग (२५-२५ बीया) करा. (२) एका भागाला रॉझोबीयमची बीजप्रक्रीया करा व ते शेतात लावा. (३) दुसऱ्या भागाला कोणतीही बीजप्रक्रीया न करता ते शेतात लावा, (४) पीकाच्या वाढीच्या नोंदी ठेवून त्याचा आलेख बनवा. दक्षता : (१) जमिनीची मशागत करताना अवजारांनी शरीराला इजा होणार नाही याची दक्षता घ्या. (२) बियाणे खरेदी करताना ते चांगल्या नावाजलेल्या कंपनीचा शिक्का पाहूनच खरेदी करा. (३) मुदत संपलेले बियाणे खरेदी करू नका. (४) थोडे बी, बियाणे खरेदी पावत्या व बियाण्यांची पिशवी जपून ठेवा. (५) पिकाला पाण्याच्या पाळ्या योग्य वेळी द्या. आपणांस हे माहीत आहे का? (१) खरीप हंगामात शेतात एकदल बियांचे पीक घेतले तर रब्बी हंगामात तिथे द्विदल बियांचे पीक घ्यावे. (२) द्विदल वनस्पतींना फक्त सुरुवातीलाच बाहेरून नत्र द्यावे लागते. नंतर त्या वातावरणातील नायट्रोजन शोषण करून त्यांची गरज भागवतात. तसेच त्याची मुळांमध्ये साठवण करतात. (३) युरीया खतापासून पिकांना नत्र (नायट्रोजन) हे मूलद्रव्य मिळते. (४) सुपर फॉस्फेट खतापासून पिकांना स्फुरद (फॉस्फरस) हे मूलद्रव्य मिळते. (५) म्युरेट ऑफ पोटॅश खतापासून पिकांना पालाश (पोटॅशियम) हे मूलद्रव्य मिळते. रासायनिक खतांमध्ये १८:१८:१८ या प्रमाणात म्हणजेच नत्र १८ भाग, स्फुरद १८ भाग व पालाश १८ भाग असतात. वरील प्रमाणात पहिला भाग नत्र, दुसरा भाग स्फुरद व तिसरा भाग पालाशची टक्केवारी दर्शवते. रासायनिक खतांच्या जास्त वापराने पीक उत्पादन काही अंशी वाढते, परंतु जमीन नापीक होण्याचा धोका असतो. (८) सेंद्रिय खते (शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत) वापरल्याने पीक उत्पादन वाढते. शिवाय जमिनीचा पोत कायम राखला जातो. प्रवाह आकृती :शेतात कोथिंबीर पीक घेणे. शेत १० गुंठे शेत तयार करणे → कुदळ, फावडे,तण, दगड गोटे तयार जमीन गरम पाणी सावलीत वाळवणे ___ → बीजप्रक्रिया धने फोडणे फोडलेले धने ५Kg. खत (७) अंकुर तण खुरपणी पाणी कोथिंबीर विक्री योग्य