पान:शेती-पशुपालन.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब-खाद्य हे महाग वाटते, परंतु ब-खाद्यामध्ये ८५% T.D.N. आहे हे अ-खाद्यापेक्षा (४०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच ब-खाद्य हे अ-खाद्यापेक्षा स्वस्त होईल. (४) खाद्यातील विशिष्ट गुण पहावेत. (ज्याप्रमाणे मनुष्य आपले खाद्य फक्त किंमतीवर ठरवत नाही.) विचारात घेण्याचे इतर गुण: (१) चव व स्वाद की ज्यामुळे जनावरांना खाद्य आवडेल. (उदा. पेंड, भुसा) (२) विशिष्ट प्रथिने,जीवनसत्त्वे इ.ने त्यांची प्रकृती सुधारेल/स्वास्थ्य राखले जाईल.(प्रथिनयुक्त खाद्य) (३) आकार,भौतिकरूप वगैरे. यामुळे जनावरांना खाद्य देणे सोपे होईल किंवा खाद्यात बचत होईल. (सुग्रास गोळ्यांच्या स्वरूपात (पेलेट) किंवा कडबा कुट्टीच्या स्वरूपात) खाद्यामध्ये वरील गुण देण्याची क्षमता असेल तर त्यासाठी जास्त किंमत देणेसुद्धा परवडेल. पूर्व तयारी : उपक्रमांची निवड : (१) गायीच्या गोठयास भेट देऊन त्यांच्या रोजच्या चाऱ्यांच्या नोंदीविषयी माहिती घ्या. (२) एका गायीच्या रोजच्या आहारातून तिला किती TDN मिळते, हे गणिताच्या साहाय्याने सोडवून पहा. (३) मुलांचे ३ गट करून गाई, म्हैस, शेळी यांना एका दिवसात किती चारा दिला जातो यांच्या नोंदी घेऊन त्यांचे त्या दिवसाचे TEN ठरवा. निदेशकाने करावयाची पूर्व तयारी : (१) शेतकऱ्याला त्याच्या गायींची माहिती घेण्याची पूर्व परवानगी घ्या. (२) प्रात्यक्षिकापूर्वी एक दिवस अगोदर त्या शेतकऱ्यास आपल्या जनावरास देत असलेल्या चाऱ्याविषयी नोंदी घ्यावयास सांगा. (३) प्रात्यक्षिकाचे चाऱ्या विषयीचे गणित अगोदर स्वतः सोडवून पहा. अपेक्षित कौशल्य : (१) आहाराच्या नोंदी ठेवता येणे. (२) जनावराचे आहारानुसार TDN काढता येणे. (३) वजनानुसार आहार ठरविता येणे. (४) दुधाच्या प्रमाणानुसार TDN देता येणे. (५) चाऱ्यात TEN चे प्रमाण सांगणे. (६) जनावराच्या वजनावर त्याचा आहार सांगणे. माहिती : जनावरांना चाऱ्याची गरज दोन कारणांसाठी असते - (१) शरीर वाढीसाठी (२) उत्पादनासाठी किंवा कार्यशक्तीसाठी. जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यातील सर्वच भागाचे पचन होते असे नाही. चाऱ्याच्या प्रकारानुसार व त्यातील घटकांनुसार त्यातील पचनयोग्य घटक वेगवेगळे असतात. जनावरांना स्वतःच्या शरीरासाठी म्हणजे जीवनमान सांभाळण्यासाठी एक किलो वजनासाठी १० ग्रॅम एवढे TDN द्यावे लागते. जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याचा हिशेब करताना पुढील माहिती उपयोगी आहे. खुराक प्रकार एकूण पचनयोग्य अन्नघटक(%) चारा वैरण एकूणपचनयोग्य अन्नघटक(%) हरभरा | हिरवी ज्वारी (कडवाळ) मका हिरवा मका लसूण घास भुईमूग पेंड मक्याचा मूरघास सरकी पेंड ज्वारीचा कडबा गव्हाचा कोंडा(भुसा) बाजरीचे सरमाड सुग्रास ऊसाचे वाढे ७६ ७७ सरकी ८० ७१ Y = 0 तक्ता क्र.१ तक्ता क्र.२ ४४