पान:शेती-पशुपालन.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विशेष माहिती: • वनस्पतीचे/झाडाचे कलम करताना संजीवक म्हणून आपण केरोडेक्स पावडर वापरतो. कारण या पावडर लावण्यामुळे लवकर फुटण्यास वाव मिळतो. त्याशिवाय पावडरमुळे ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणचे अनावश्यक जीवजंतू मारले जातात. त्यामुळे मुळे लवकर फुटतात. केरोडेक्सशिवाय IBA, G.A., IAA, सिरॅडिक्स इत्यादीचाही वापर संजीवक म्हणून केला जातो. त्यांचेबरोबर स्पॅगनम मॉसचा हा वापर केला जातो. स्पॅगनम मॉसमुळे ते ओले केल्याने त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने त्या कलमास वरून पाणी देण्याची गरज भासत नाही. जर गरज भासलीच तर स्पॅग्ननामॉस हवेतील आर्द्रता शोषून घेते त्यामुळे कलमाला तयार होताना पाण्याची गरज अशा रितीने भागविली जाते. • कलमास आतून मुळ्या फुटल्यात हे कसे ओळखाल तर त्या कलमाचा वरील भाग फुगीर बनलेला असतो. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ.७ वी, प्रकरण१६, सजीवांतील प्रजनन आणि वाढ, पान क्र.१२२-१२७. (२) विज्ञान आणि तंत्रज्ञान, इ. ९ वी, भाग २,प्रकरण ११, जीवन प्रक्रिया III प्रजनन, पान क्र.१५४ १६४,घटक - शाकीय प्रजनन, प्रकाशन २००५. दिवस : पाचवा प्रात्यक्षिक : जनावरांचे वजन, दुधाची क्षमता व चाऱ्यातील टी.डी.एन.च्या प्रमाणानुसार खाद्य ठरविणे. TDN (Total Digestable Nutrients) प्रस्तावना : शरीराला ऊर्जा देण्यासाठी व शरीराची वाढ, तंदुरुस्ती व स्वास्थ्य राखण्यासाठी खाद्याची गरज असते. म्हणून खाद्यात पुरेशी ऊर्जा व शरीराला लागणारी प्रथिने, क्षार यांचा समावेश पाहिजे. शिवाय पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही अपचनीय जास्त आकारमानाचे घटकही आहारात असावे लागतात. पशुखाद्य चारा खुराक हिरवा वाळलेला कडधान्ये कारखान्यातील उपउत्पादने मका, ज्वारी इ. धान्ये, उदा. साखर काढल्यानंतर मळी, तेल काढल्यानंतरची ऊस, बटाटा, टॅपी, ओका पेंड, नासलेल्या दुधातील प्रथिने हिरवा चारा, ऊस वगैरे खाद्यात पाण्याचा अंश जास्त असतो. ही खाद्ये जनावरांना चविष्ट लागतात. खुराकात अन्नघटक व ऊर्जा जास्त प्रमाणात असतात, यामुळे दुधावर चांगला परिणाम होतो. पशुखाद्य निवडताना पुढील बाबींचा विचार करावा - (१) पाण्याचा अंश (२) T.D.N. (एकंदर पचन होईल अशा खाद्याचा अंश) चारा : ४०-५५%, पेंड : ८०-९०%, धान्य : ७०-९०%. (३) किंमत : खाद्ये विकत घेताना पचन होणाऱ्या घटकाच्या वजनावर किंमत बघावी. उदा. अ-खाद्यामध्ये ४०% T.D.N. – याची किंमत १.०० रू. प्रति ग्रॅ., ब-खाद्यामध्ये ८५% T.D.N. – याची किंमत २.०० रू. प्रति ग्रॅ. असेल तर अ-खाद्याचा अर्धा किलोचा भाव ५००/-रू. व ब-खाद्याचा अर्धा किलोचा भाव १०००/-रू. होतो. फक्त भाव पाहिल्यास ४३