पान:शेती-पशुपालन.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) द्रवरूप खते, औषधे पाण्यामधून देता येतात. खतांचे व औषधांचे नुकसान कमी प्रमाणात होते. (५) तणांचे प्रमाण अत्यंत कमी राहते. (६) जमिनीची धूप अजिबात होत नाही. मातीच्या कणांची पोत व रचना बदलत नाही. (७) बाष्पीभवनाने किंवा पाझरण्याने होणारे पाण्याचे नुकसान कमी होते. तोटे: भांडवल जास्त लागते.पाणी स्वच्छ नसल्यास नळ्या बंद होतात. आकृती: (२) तुषार सिंचन पद्धती : बंद पाईपमधून विशिष्ट दाब देऊन पाणी पावसासारखे उडवून देण्याच्या पद्धतीला तुषार सिंचन म्हणतात. या पद्धतीत नळीच्या साहाय्याने दाबाखाली शेतात पाणी आणून ते तुषारांच्या (स्प्रिंकलरच्या) साहाय्याने सर्वत्र फवारले जाते. जेथे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते व जमीन समपातळीत नसते तेथे ही पद्धत अत्यंत सोयीची आहे. या पद्धतीने उंचसखल जमिनीत सर्वत्र सारखे पाणी देता येते. पाण्याचा अपव्यय कमी होतो. जमीन समपातळीत आणण्याचा खर्च वाचतो. लहान रोपे व पूर्ण वाढलेली झाडे यांना पाहिजे तसा पाणी पुरवठा करता येतो. पाण्यातून खते किंवा पिककिडींवरील औषधे देता येतात. आकृती - 4 शेती व्यवस्थापनामध्ये पिकांना किती पाणी द्यावे, केव्हा द्यावे हे ठरविणे फार महत्त्वाचे आहे. पाणी उपलब्ध आहे म्हणून पाणी देणे म्हणजेच पाण्याचा अपव्यय आहे. त्याचप्रमाणे खर्च व वेळ दवडणे आहे. जमिनीचा प्रकार, पिकांची पाण्याची गरज ओळखण्याची साधी, सोपी पद्धत म्हणजे सहा इंच खोलीतील माती हातात घेऊन याचा गोळा करायचा प्रयत्न करावा. गोळा झाला तर पाण्याची जरूरी नाही. पिकांना पाण्याची गरज पुढील वेळी असते-(१) फुटवे फुटण्याच्या वेळी. (२) पीक फुलोऱ्यात येते तेव्हा. (३) ओंबी बाहेर पडण्याच्या वेळी. (४) दाणा भरण्याच्या वेळी. पिकानुसार गरज बदलेल. उदा. बटाटा/शेंगा पिकाच्या बाबतीत जमिनीत घेण्याच्या वेळी कापसाच्या बाबतीत बोंडे लागण्याच्या वेळी, गव्हाच्या वेळी मुकुटमुळे लागण्याच्या वेळी, ज्वारी पीक पोटरीत असेल त्यावेळी इ. पाणी देण्याच्या वेळेवरून पिकाला प्रत्येक पाळीस किती पाणी लागते त्याचप्रमाणे पिकाच्या आयुर्मर्यादेवरून एकूण किती पाळ्या होतात हे ठरवले जातात. निरनिराळ्या पिकांच्या पाण्याच्या पाळ्या व पाणी किती द्यावे हे खालील कोष्टकात दिले आहे. | पिकाचे नाव | पिकाचा कालावधी - पिकाच्या पाळ्या पाळ्यांतील अंतर | लागणारे पाणी । ज्वारी (बा.) ४ महिने २५-३० दिवस २-३ इंच ज्वारी (जि.) ४ महिने ४० दिवस २ इंच बाजरी ३ महिने ३० दिवस भुईमूग ३-५ महिने ३-४ २०-२५ दिवस १.५ - २ इंच हरभर ३१ महिने ३० दिवस २ इंच आपल्याकडील बरीचशी जमीन कोरडवाहू आहे, त्यामुळे पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक, काटेकोरपणे व हिशोबशीरपणे करणे अत्यावश्यक आहे. जमीन सच्छिद्र आहे. या छिद्रातून मातीचे कण २ इंच ४०