पान:शेती-पशुपालन.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वतःभोवती पाण्याचे कण पकडून ठेवतात. या पावसाचे पाणी किंवा कृत्रिम पाणीपुरवठ्याने पाण्याचा साठा वाढतो आणि पिकांच्या द्वारा, बाष्पीभवनाच्याद्वारा हा साठा कमी होतो हे खालील समीकरणावरून लक्षात येईल. जमिनीतील पाणी = महिन्याच्या + पावसाचे पाणी - बाष्पीभवन आणि (महिन्याच्या शेवटी) सुरुवातीचे पाणी कृत्रिम पाणी उच्छ्वासाचे पाणी संदर्भ :(१) भारत-मानवी पर्यावरण,इ. ९वी, प्रकरण ३, जलसंसाधने,पान नं.८-९,घटक-जलसिंचन, प्रकाशन २००७ (२) शिक्षक हस्तपुस्तिका, इ. ९वी, पान नं. ९३-९८ दिवस : चौथा प्रात्यक्षिक : कलम करणे, पाचर कलम व डोळा भरणे. प्रस्तावना : आजच्या युगात लवकरात लवकर व जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीतील उत्पन्नास जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. आज अन्न-धान्याबरोबरच शेतीतील इतर उत्पन्नासही जास्त महत्त्व आहे. आज शेतीत नर्सरी बांधून नर्सरीत फुलझाडे घेतली जातात. त्यांनाही जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील वर्षी आपण छाट कलम, दाब कलम व गुट्टी कलम इ. कलमांविषयी शिकलो आहोत. तर आज आपण पाचर कलम, डोळा भरणे इ. कलमांविषयी सविस्तर माहिती पाहू, पूर्व तयारी : निदेशकांनी लक्षात घ्यावयाच्या बाबी : (१) अगोदर तयार केलेल्या कलमांच्या रोपांना पाणी देण्याचे नियोजन गटात करा. (२) ज्या रोपांवर / झाडांवर कलम करावयाचे ती झाडे/रोपे यांची निवड करून ठेवा. (३) कलम करण्यासाठी मूलांचे २ ते ३ गट तयार करा. (४) अगोदर जवळच्या कलम तयार करणाऱ्या नर्सरीस भेट देवून त्यांची भेट देण्यास पूर्व परवानगी घ्या. (५) कलमाविषयी व नर्सरीविषयीची सी.डी. मुलांना दाखवण्याची व्यवस्था करा. उपक्रमांची निवड करणे : (१) १००० आंब्याच्या रोपांचे पाचर कलमाद्वारे रोपे तयार करा. (२) गुलाबाच्या बागेची डोळा भरणी करून द्या. (३) शेतकऱ्यांच्या संत्री व मोसंबी बागेत त्यांच्या रोपांचे डोळे भरून द्या. प्रात्यक्षिकाची पूर्व तयारी: (१) प्रात्यक्षिकाच्या पूर्वी प्रात्यक्षिकास लागणारी साधने व साहित्य जमा करून ठेवा (सी कटर, बडिंग नाईफ). (२) मुलांचे गट करून त्यांना कलमांविषयी अगोदर संदर्भ माहिती सांगावी. (३) मुलांना प्रात्यक्षिक करताना घ्यावयाच्या काळजीविषयी सांगावे. अपेक्षित कौशल्ये : (१) कलमांच्या हत्यारांची ओळख होणे. (२) कलमासाठी पाचरांची निवड करतात. (३) डोळे भरण्याचे कौशल्य येणे. (४) डोळे भरण्याचे विविध प्रकार येणे. (५) कलम व्यवस्थित बांधता येणे. ४१