पान:शेती-पशुपालन.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फायदेः (१) पिकांचा पाण्याशी थेट संबंध येत नाही. (२) जमिनीत हवा खेळती राहते. (३) जमिनीचा पोत कायम राहतो. (४) सऱ्यातील आर्द्रता बराच काळ टिकते. तोटे : पाणी सावकाश दिले पाहिजे. अन्यथा जमिनीची धूप होण्याची शक्यता असते. (ब) वाफे पद्धतः (१) सपाट वाफा पद्धत : ज्या पिकास पाणी लागते व ज्या पिकांची पेरणी दाट करतात, त्यांना या पद्धतीने पाणी देतात. वाफ्याचा आकार २ X ४ किंवा ३ x ४ मीटर असतो. फायदा: लहान वाफे तयार करून पाहिजे त्या प्रमाणात पाणी देता येते. तोटा : जास्त भारी जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी साठून राहते व मुळे सडण्याची भीती असते. आकृती: होता. पिकाचा व पाण्याचा प्रत्यक्ष (२) गादी वाफा पद्धत : ही पद्धत पावसाळ्यात मोठया प्रमाणात वापरतात. २० से.मी उंच, १ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेवून वाफे बनवावेत. दोन गादी वाफ्यात ६० सेमी ते ७५ सेंमी रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते. आकृती फायदा : पाण्याचा निचरा चांगला होतो. पिकाचा व पाण्याचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. मुळांना हवा मिळते. योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करता येतो. तोटा:आर्थिक गुंतवणूक जास्त आणि कुशल कामगारांची आवश्यकता. (क) आळे पद्धतः ज्या पिकांना ऋतुमानाप्रमाणे पाणी लागते, अशा पिकांना ही पद्धत अवलंबतात. उदा. फळझाडे तोटे : हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी राहते. आकृती * जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती: (१) ठिबक पद्धत (२) तुषार पद्धत (१) ठिबक सिंचन पद्धत : बंद पाईपमधून विशिष्ट दाब देऊन पाणी झाडाच्या गरजेप्रमाणे थेंबाथेंबाने देण्याच्या पद्धतीला ठिबक सिंचन असे म्हणतात. यात पाणी प्रथम मुख्य मोठ्या PVC पाईपमध्ये व नंतर त्याला जोडलेल्या लहान पाईपमध्ये व शेवटी केशाकर्षण नळ्या किंवा एमिट्टरमधून हळूहळू ठिबकते, पण सतत झाडांच्या मुळांशीच दिली जाते म्हणून या पद्धतीस ठिबक पद्धत म्हणतात. फायदेः (१) पाण्याची बचत होते. पाणी किती दिले गेले याचे मोजमाप ठेवता येते. (२) पाण्याचे वाटप समप्रमाणात होते. त्यामुळे पिकांची वाढ समप्रमाणात होते. (३) मशागतीची कामे पाणी देत असताना केली जातात. ३९