पान:शेती-पशुपालन.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाडाला द्यावयाच्या पाण्याची क्षमता मोजणे : (१) एका केशनलिकेत एका मिनिटाला किती लीटर (मिलीलीटर) पाणी पडते ते मोजणे. (२) त्यास एकूण वापरलेल्या केशनलिकांच्या एकूण संख्येशी गुणावे म्हणजे एका मिनिटात सर्व नलिकांमधून किती पाणी पडते ते कळते. (३) त्यावरून ताशी हिशोब करून इतर आकडेमोड करता येते. उदा. एका केशनलिकेतून ५ मिली. पाणी एका मिनिटाला पडत असून ठिबक सिंचन संचाने १५० रोपांना पाणी दिले जात आहे तर एकूण किती लीटर पाणी दिले जाईल? ५मिली.= १ मिनिट = १ झाड तर ? = १ मिनिट = १५० झाडे १५०४ ५ = ७५० मिली. (म्हणजेच एका मिनिटात १५० झाडांना ७५० मिली. पाणी लागेल) प्रत्येक झाडाला त्याच्या आकाराप्रमाणे पाण्याची गरज असते. जेथे गरज माहित नाही तेथे साधारण १ मीटर उंचीला प्रतिदिन ५ ली. पाणी द्यावे. इतर माहिती : पाणी पुरवठा भाग १ : पिकांना कृत्रिम पद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीस 'पाणी पुरवठा' किंवा 'जलसिंचन' असे म्हणतात. सिंचन पद्धतीतील तुलनात्मक तक्ता : निकष | मोकाट तुषार साधारण सुरुवातीचा खर्च । सुरुवातीचा खर्च जास्त येतो जास्त येतो | श्रम कमी दारे धरण्यास । कमी कमी | पाण्याची बचत होत नाही होत नाही | उत्तम बचत होते | बचत होते देखभाल । कमी खर्च लागतो | कमी कमी जमिनीवर जमिनीचे कण । उत्तम पद्धत जमिनीवर परिणाम | उंच सखल जमिनीलाही होणारे परिणाम हलतात पिकांना | आहे. उतारातून नाही. तणांची संख्या पाणी पुरवठा करता येतो, पाणी स्पर्श करते. साऱ्यांची लांबी | कमी योग्यवेळी योग्य प्रमाणात ठेवावी पाणी देता येते. (अ) सरी पद्धत : पिकांच्या ओळींमधून सऱ्या काढून त्यामधून पाणी देणे. सऱ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार १० ते २० फूट ठेवतात. या पद्धतीत पाण्याचा व पिकांच्या मुळांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. पाण्याची बचत होते. दोन सरींच्या वरचा माथा २-३ फूट रूंद असल्यास केशाकर्षणामुळे रूंद माथ्याच्या मध्यापर्यंत पाणी सहज पोहचू शकते. आकृती पाट ठिबक खर्च कमी एक आड एक खुली सरी पद्धत एकाच दिशेने सर्व सऱ्या खुल्या ३८