पान:शेती-पशुपालन.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भारतीय गाय सामान्यतः दररोज ५-६लीटर दूध देते. तथापिजर्सी + होल्सटन : रेड डीन वळूशी तिचा संकर झाल्यानंतर मिळणाऱ्या पैदाशीपासून १०-१२ लि. दूध मिळते. अशा पकारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी यांनीही फुले त्रिवेणी नावाच्या गाई संकरणातून तयार करण्यात आली. तर आज आपण कृत्रिम रेतन काय असते हे पाहण्यासाठी आपण जनावराच्या दवाखान्यात भेट देऊ व तेथील माहिती जाणून घेऊ. पूर्व तयारी: निदेशकाने करावयाची पूर्वतयारी (१) प्रात्यक्षिकाच्या आदल्या दिवशी जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्टरांची परवानगी घ्यावी. (२) गावात दवाखाना नसेल तर डॉक्टरांना शाळेत बोलावण्याचे व माहिती देण्याचे नियोजन करा. (३) कृत्रिम रेतनविषयी माहिती देण्यासाठी सी.डी. दाखवण्याचे नियोजन अगोदर करून ठेवा. प्रात्यक्षिकाची पूर्व तयारी: (१) दवाखान्यास भेट देण्यासाठी जाताना मुलांचे गट तयार करा, (२) दवाखान्यात गेल्यानंतर विचारावयाच्या प्रश्नांची यादी तयार करा. (३) कृत्रिम रेतनविषयी माहिती वरील संदर्भातून अगोदर सांगा. (४) मुलांना प्रात्यक्षिकासाठी दवाखान्यात घेऊन जा.. उपक्रमांची निवड :(१) कृत्रिम रेतनाविषयी माहिती देण्यास डॉक्टरांना गावात बोलावून शेतकऱ्यांना माहिती द्या. (२) कृत्रिम रेतनाचे फायदे व दुध वाढीच्या विषयी शाळेत कार्यक्रम आयोजित करा. (३) गावातील जनावरांच्या दवाखान्यास भेट देऊन कृत्रिम रेतनाविषयी माहिती द्या. अपेक्षित कौशल्ये (१) कृत्रिम रेतनाचे साहित्य ओळखता येणे. (२) साहित्याचा वापर समजून घेणे. (३) संभाषण करता येणे. इतर माहिती: कृत्रिम रेतन: (AI.) 1.A.I.FArtificial Insimenation कृत्रिम रेतन : एकाच चांगल्या दर्जाच्या वळूपासून चांगल्या जातीची पैदास होण्यासाठी A.I. करतात. (१) म्हणजेच त्या वळूचे वीर्य जमा करून एका पद्धतीने ते जतन करून जास्त मादींना (म्हणजे २०० २५०) ते देता येते (नेहमीच्या पद्धतीने फक्त एकाच मादीला वीर्य प्रत्यक्ष संबंधाने देता येतो.) (२) या पद्धतीत वळूचा गाईंशी संबंध येत नाही. म्हणून रोग पसरत नाही. (३) कमकुवत किंवा लंगड्या जनावरांना गर्भधारणा देता येते. बैलाचे वजन गाईला धरावे लागत नाही. (४) वीर्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविता येते. गाईला दूर नेण्याची गरज नाही. खालील गोष्टींचा विचार : (१) प्रत्यक्ष वळूचे वीर्य काढण्याची पद्धत (२) ते साठविण्याची दक्षता/पद्धत (३) ते प्रत्यक्ष(कृत्रिम पद्धतीने) देणे, १. वळूचे वीर्य काढण्याची पद्धतः (१) नेहमीच्या पद्धतीने गाय दाखवितात. (२) कृत्रिम पद्धतीने केलेली गाईच्या योनीसारखी योनीने त्याचे वीर्य गोळा करा. (योनी हातात धरणे.) २६