पान:शेती-पशुपालन.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकृती: घेणे PICTIOळतायण पातळीनुसार मोजमाप अपेक्षित कौशल्ये: (१) रिडींग वाचता येणे, (२) साहित्य हाताळता येणे. साहित्य व साधने : लॅक्टोमीटर, दूध, मेजरिंग सिलेंडर इ. कृती: (१) प्रथम१००मि.ली. दूध मेजरिंग सिलेंडरमध्ये घ्या, (२) त्यात लॅक्टोमीटर सावकाश सोडा. (३) लॅक्टोमीटर सोडताना तो थोडा फिरवून सोडा, (४) निम्मा दुधात बुडलेला दिसेल. (५) लॅक्टोमीटरवरचे आकडे वरील बाजूने मोजा. जो आकडा असेल तो त्याचा लॅक्टो होय. दुधातील भेसळ : दुधामध्ये साधारणपणे साखर, युरीया, दूध पावडर, अमोनिअम सल्फेट, कपडे धुण्याची पावडर, हायड्रोजन पॅरॉक्साईड, ग्लुकोज इ. भेसळ करतात दुधामध्ये भेसळ हि दुधाचे उत्पादन, एस. एन. एफ. वाढविण्यासाठी तसेच कृत्रिम दूध करण्यासाठी करतात. अधिक माहितीसाठी दुधामध्ये पाणी टाकणे ही एक प्रकारची भेसळ मानली जाते. दिवस : आठवा प्रात्यक्षिक : कृत्रिम रेतन प्रस्तावना : भारत हा देश पशुपालन व्यवसायात जगात अग्रेसर देश आहे. भारतात पशुसंख्या व पशु उत्पन्न सर्वाधिक आहे. दूध उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. यात म्हशींच्या दुधाचा वाटा सर्वात जास्त असून त्या खालोखाल गाई व शेळ्यांच्या दुधाचा वाटा आहे. असे होण्याचे कारण काय तर भारत सरकारने सुरू केलेली १९७१ ची दुधाची महापूर योजना/ धवल क्रांती होय, या धवल क्रांतीचे प्रणेते डॉ. व्हर्गिस कुरिअन हे आहेत. या धवलक्रांतीस महत्त्वाची जी गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे संकरीकरण/ कृत्रिम रेतन पद्धत होय. २५