पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागतील याविषयी संघटना काहीच ठोस कार्यक्रम सांगत नाही. सहकारी चळवळीस संघटनेचा विरोध आहे काय?

 ग्रामीण भागातील अतिदुर्बल वर्गासाठी रोजगार हमी योजनेसारख्या योजनांचा संघटना पुरस्कार का करीत नाही?

 चर्चेनंतर कार्यकर्ते म्हणतात- या समस्यांविषयी आमचे गैरसमज होते. या प्रश्नाचे खरेखुरे स्वरूप आम्हाला आज समजले. आमच्यासारख्या इतर कार्यकर्त्यांनाही हा नवा विचार कळला पाहिजे. शेकापविषयी काही लिहावे हा आग्रह मुख्यतः शेकापच्या जुन्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्याविषयीच्या आदरापोटी आज हा विषय लिहायला घेतला आहे.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १२६