पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तंबाखूच्या उत्पादन खर्च किलोला ११.४० रु. येतो. काहींना ८ ते ९ रु. भाव मिळतो; परंतु शेतकऱ्याला सरासरी रु. ३.६० भाव मिळाला आहे.
 संकरित गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च रु. ३.८० दर लिटरला आहे. पण किंमत मात्र रु. २.१० ते रु. २.५० मिळते. भाताचा प्रकार तर भयानक आहे भंडारा जिल्ह्यात भाताचा उत्पादन खर्च किलोला रु.३.२२ पेक्षा कमी असूच शकत नाही. भाताचा संपूर्ण अभ्यास अजून व्हावयाचा आहे. कदाचित हा खर्च याहूनही जास्त निघेल. पण कित्येक वर्षे भाताला फक्त रु. १.२० ते रु १.४० चाच भाव मिळतो. काही गावात तर ८५ ते ९० पैसे किलोने भात खरेदी केले जाते. कपाशीचा उत्पादन खर्च सरकारी आकडेवारीनुसार क्विटलला रु.६८७ आहे. पण सरकारी खरेदी यंत्रणा शेतकऱ्याला क्विंटल कापूस विकावा आणि एक तोळा सोनं घ्याव. आज एक तोळा सोनं घ्यायचं झालं तर ४ ते ५ क्विंटल कापूस विकावा लागतो.
 * हे हिशोब १९८० सालातील आहेत.
 ही जर परिस्थिती असेल आणि शेती व्यवसायात शंभराचे साठच होत असतील तर जे काही थोड्या ठिकाणी वैभव दिसतं ते शेतीतनं आलं किंवा नाही याबद्दल जबरदस्त प्रश्न आपण निर्माण करतो.
 सारांश, शेतीमालाचा उत्पादनखर्च काढताना शेतीमध्ये आपण जे जे भांडवल गुंतवतो त्यावरील व्याज, औतं, औजारं, बांधकामे यांच्या दुरुस्तीचा खर्च, मजुरी घरच्या माणसांचीसुद्धा, बैलावर खर्च वगैरे सर्व खर्चाचा विचार केला पाहिजे. नैसर्गिक खतं, वरखतं, औषधं, बी-बियाणे यांचा खर्च, तयार झालेला माल साठवणुकीसाठी, वाहतुकीसाठी येणारा खर्च, कारभाऱ्याचा खर्च अशा सर्व खर्चाची बेरीज करून एकूण उत्पादन खर्च काढायला हवा. नंतर प्रत्यक्ष किती पीक येते, त्यातून सरासरी तूट लक्षात येऊन सरासरी उत्पादनखर्च काढायला हवा. खर्चाचे आकडे कसे काढायचे? एकाच्या शेतामधले आकडे आणि दुसऱ्याच्या शेतामधले आकडे याच्यात एका गावातसुद्धा फरक पडतो.

 सरकारी समितीच्या आकडेवारीतसुद्धा उत्तर प्रदेशातील गव्हाचा उत्पादन खर्चाचा आकडा आणि नाशिक भागातील उत्पादन खर्चाचा आकडा यात तिपटीचा फरक आहे. मग हा आकडा काढायचा कसा आणि शेतरकऱ्यांनी जो उत्पादन खर्च भरून मागितला आहे तो कोणता भरून द्यायचा? याकरता शासनाने एक युक्ती योजली आहे. शेतीमालाचे भाव ठरविण्यासाठी कृषिमूल्यआयोग म्हणून एक समिती

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ३२