पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवसायावरच अवलंबून आहे अशा गावात जर भू-विकास बँक किंवा पंचायत समितीची एखादी नवी इमारत असेल तर तेवढेच त्या गावातील नवीन बांधकाम अंबेजोगाईच्या मोरेवाडीत दगडी बांधकामाच्या मोठमोठ्या इमारती आहेत. सर्व ढासळलेल्या, पडायला आलेल्या. एखादी भिंत पडली तर सावरायची ताकद नाही. पूर्वी बांधलेल्या मोठ्या वाड्यात भिंती घालून किंवा कुडं उभी करून शेतकऱ्यांची विभक्त कुटुंब राहतात. पण नवीन इमारती झालेल्या दिसत नाहीत. तेव्हा शेतकरी काय खातात, कसे राहतात, कपडे काय घालतात यावर विचार करा म्हणजे लक्षात येईल की दारिद्र्य हे वाढतं आहे.
 हे दारिद्र्य हटवणे हे शेतकरी आंदोलनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी शेती किफायतशीर केली पाहिजे म्हणजेच शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघाला पाहिजे.

 ****

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । २५