पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 - मुंबईत आलेले पहिले शेतकरी पक्क्या चाळीत राहिले. निर्वासितांची संख्या वाढली तसे ते पत्र्याच्या चाळीत राहू लागले. तेथून झोपडपट्टी आणि आता फुटपाथ.
 - झोपडपट्ट्यांत आणि फुटपाथवर राहणाऱ्यांत ग्रामीण भागात जगता येत नाही म्हणून निघून आलेल्यांचे प्रमाण प्रचंड आहे.
 - झोपडपट्ट्यातील वा फुटपाथवरील भयानक आयुष्य हेही ग्रामीण भागातील उपासमारीपेक्षा बरे असा आर्थिक सुज्ञतेचा विचार करून ही मंडळी शहरात राहणे पत्करतात.
 दारिद्र्याविषयी दुसरा महत्त्वाचा, लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे कोरडवाहू शेतीतील दारिद्र्य हे वाढतं आहे. ते कमी होत नाही आणि आहे तितकंचही राहत नाही. ४०/५० वर्षे वयाचे शेतकरी आहेत त्यांनी आठवून पाहावं की आपण १०/ १२ वर्षांचे होतो तेव्हा आपल्या घरी दररोजच्या जेवणात काय काय असायचे? भाजीपाल्याचे कालवण किती वेळा असायचे? ताटात ताक, दूध, दही किती वेळा असायचे? कालवणाला निदान दोन थेंब तेलाची फोडणी किती वेळा असायची? आपल्या घरात आईला, आजीला धड लुगडी किती वेळा असायची? आणि आता हेच उलटे विचारून पाहू. आता स्थिती काय आहे? आपल्या घरातील दहा वर्षाचं पोर, नातवंड जेवायला बसलं तर त्याच्या ताटात ताक, दूध, दही किती वेळा पडतं? घरातील स्त्रीला धड लुगडी किती असतात? या प्रश्नांची उत्तरेच आपल्याला दारिद्र्य वाढतं आहे असं नमूद केलेलं आहे. पण आपल्या अभ्यासात या सरकारी आकडेवारीवर आपण कुठेही विश्वास ठेवणार नाही. विसंबून राहणार नाही. कारण ही आकडेवारी कधी आणि कशा पद्धतीने मांडली जाईल हे सांगता येत नाही. ही जर एकदा आपण गृहीत धरली तर तिच्या आधाराने आपली फसगत होण्याची शक्यता आहे. ती आकडेवारी कशी तयार झाली हे तपासून पाहण्याची आपल्याला
 *पहा :-

1) The Urban Poor A.M. Singh & Alfre de Souza.
2) Pavement Dwellers in Bombay P. Ramchandran.
3) Study of a large heterogeneous sulm in Bombay Desai & Pillai.
4) The Urban Poor & Social Change Mujumdar.

संधी नाही. म्हणून ती न वापरता प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांना काय दिसतं,

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । २३