पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एकाच व्यवस्थेखाली भरडले जात आहेत' ही गोष्ट ग्राहकांच्या मनावर प्रथमतः सवली पाहिजे; परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की शेतकरी व ग्राहक यांच्यात भांडण लावून शेतकरी आंदोलनाचा पराभव करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तेव्हा ग्राहकांशी किंवा मध्यमवर्गीयांशी बोलताना हे आंदोलन ग्राहकविरोधी आहे, त्यांना त्रास देणारे आहे, या शंकावर सध्या जास्त भर देऊ नये. या विषयाचा अभ्यास करताना ग्राहकांना कोणते त्रास व का होणार आहेत, तसेच फायदे कोणते होणार आहेत याचा अभ्यास करू पण प्रचार करताना ग्राहकांच्या होणाऱ्या फायद्यांवर जास्त जोर दिला पाहिजे. काही दिवसांनी अशी काळजी घेण्याचे कारणही उरणार नाही.
 शेतकरी आंदोलन अजून बाल्यावस्थेत आहे, तरीसुद्धा वर्तमानपत्रीय टीका अभ्यासहीन आहे. हल्लीचे संपादक क्रिकेटपटूपासून शेतकरी-आंदोलनापर्यंत सर्वाविषयी सारख्याच अधिकाराने सल्ले देत असतात. बहुतेकांची धोरणे ही परिस्थितीनुरूप बदलत असतात. युरोपमधील फ्रांसचा बादशहा सम्राट नेपोलियन याच्या राज्यात एकदा बंड झाले आणि त्याला पकडून दूरवर एल्बा बोटावर तुरुंगात ठेवले गेले. नेपोलयनने तिथून आपली सुटका करून घेतली. त्यावेळी पॅरिसच्या वर्तमानपत्रांनी 'दरोडेखोर नेपोलियनचे तुरुंगातून पलायन' अशा ठळक मथळ्याखाली ही बातमी प्रसृत केली. पुढे नेपोलियनने सैन्य जमा करून प्रदेशामागून प्रदेश काबीज केले. जसजसा नेपोलियन राजधानी पॅरिसच्या जवळ येऊ लागला, तसतसे वर्तमानपत्रांचे मथळे बदलत गेले आणि नेपोलिनयन पॅरिसच्या वेशीपाशी सेनेसह आला तेव्हा वर्तमानपत्रांनी 'सम्राट नेपोलियचे भव्य स्वागत' असे ठळक मथळे दिले. तात्पर्य, शहरातील काही लोकांची विचारसरणी ही दबावप्रणीत असते. डोक्याने विचार करणारे थोडे, खिशाने विचार करणारे जास्त. आपल्याला एखाद्या गोष्टीपासून काही तोशीस पडणार नसेल तर दुर्लक्ष, नाहीतर पहिल्यापासून विरोध करण्याची प्रवृत्ती जास्त.

{{gap}आज आंदोलनाची ताकद अत्यंत लहान आहे. नाशिकला २८ नोव्हेंबरला आंदोलन स्थगित केल्यापासून फक्त १४ जिल्ह्यांतून संघटनेचा प्रसार झाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन लाख शेतकरी संघटनेत सामील झाले आहेत. नवीन १४ जिल्ह्यांतून पाच लाख तरी शेतकरी बाहेर येतील. म्हणजे आता संघटनेची ताकद ७ लाखांची झाली. अशा तऱ्हेने ताकद वाढवत नेली तर लोक म्हणतील शेतकरी

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १९