पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा वेळी शेतकऱ्याला व्यापाऱ्याचे पाय धरून कमी भावात तंबाखू विकण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. तंबाखूचे भाव जर सौद्याच्या भावापेक्षा वधारले तर मात्र व्यापारी सौद्याच्या कमी भावानेच खरेदी करतो. अशा तहेने भावात मारल्यावर मालाचे प्रत्यक्ष वजन करताना काडीसूट, मातीसूट, हवासूट अशा तऱ्हेच्या अकरा तऱ्हांनी वजनात कपात करण्यात येते. अक्कोळच्या सुप्रसिद्ध कडक तंबाखूच्या पूर्ण झाल्यावर रोख पैसा मिळत नाही. झालेल्या रकमेवर ५ ते १२ टक्के सूट कापली जाते. एकूण रक्कम २४४२ रु. झाली तर वरचे ४४२ रु. सोडून देऊन फक्त दोन हजारच देतात. अशा तऱ्हेने लूट होऊनसुद्धा शेतकरी उघडपणे तक्रार करू शकत नाहीत इतके दहशतीचे वातावरण निपाणीच्या व्यापारपेठेत आहे. अशा स्थितीत १४ हजार शेतकरी भव्य मंडप उभारून एकत्र जमू शकतात यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. १९७२ साली अक्कोळच्या तंबाखू उत्पादक तरुणांनी आंदोलन केले होते. त्यांनी ६४ व ७८ साली रास्ता रोको आंदोलने केली होती. त्यामुळे चाकण-नाशिक भागात जी आंदोलने झाली त्यात नवीन काही आहे असे म्हणणे बरोबर नाही. मुख्य गोष्ट आता शेतकऱ्याची वेळ आली आहे. म्हणूनच ८० सालचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर वणव्यासारखे पसरते आहे.
 शेतीमालाचे भाव वाढले म्हणजे पर्यायाने महागाई वाढत जाईल असे शहरांमधून राहणाऱ्या डॉक्टर, वकील, ऑफिसर्स, कारकून आणि इतर मध्यमवर्गीयांना वाटत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त भावाच्या मागणीचे परिणाम ग्राहकावर काय होतील हा आपला अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, तो आपण नंतर अभ्यासू; परंतु शहरातील ग्राहकांशी संबंध येणाऱ्या कार्यकर्त्यांनी 'उत्पादक शेतकरी आणि ग्राहक हे दोघेही'


 सत्याग्रहाच्या काळात दि. ५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी पाडव्याचा सण साधेपणाने गुढ्या उभारून आंदोलन नगरातच पार पाडला. ६ एप्रिलच्या पहाटे कर्नाटक शासनाच्या पोलिसांनी आंदोलनाच्या नेत्यांना अटक केली आणि त्यांच्याबरोबरच सर्व सत्याग्रहींनाही अटक केल्याचे जाहीर केले. सकाळी आठ वाजेपर्यंत काही सत्याग्रहींना पकडून बसेसमधून बल्लारी व गुलबर्गा येथील तुरुंगात रवाना केले. अटक करवून घ्यायची वाट पहात रस्त्यावर शांतपणे बसलेल्या शिल्लक सत्याग्रहींच्या प्रचंड जमावावर शेवटी अश्रूधूर, लाठीमार आणि अमानुष गोळीबाराचा मारा करून पोलीसांनी आंदोलन नगरी उद्वस्त करून टाकली. या आंदोलनात १२ शेतकरी हुतात्मा झाले आणि शेकडो जखमी झाले. (प्र.)

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १८